शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. उल्हास पाटील यांचा ४६ लाख तर, गुलाबराव देवकर यांचा ४४ लाख खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 11:54 IST

अंतिम ताळमेळ साधून द्यावे लागणार उत्तर

जळगाव : उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून उमेदवारांचा निवडणूक खर्च सुरू झाला अन् यावर पथकांचे निरीक्षण सुरू झाले. या कालावधीत उमेदवारांनी केलेला खर्च व निवडणूक खर्च विभागाद्वारे पहिल्या तपासणीत तफावत आढळल्यानंतर उमेदवारांना नोटीस बजावण्यात आल्या. शेवटच्या तिसऱ्या तपासणीनुसार रावेर लोकसभा मतदार संघात कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांनी ४६ लाख ७९ हजार रुपये खर्च सादर केला. त्या खालोखाल जळगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी ४४ लाख ४३ हजार रुपये, रावेर मतदार संघातील भाजप-शिवसेनेच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी ४१ लाख ८७ हजारांचा खर्च तर जळगाव मतदार संघातील भाजप शिवसेना युतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांनी ३५ लाख ६४ हजार खर्च सादर केला.उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून प्रचाराची मुदत संपण्याच्या म्हणजे, २१ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत उमेदवारांच्या खर्चावर आयोगाचा ‘तिसरा’ डोळा होता.पहिल्या तपासणीत जळगाव लोकसभा मतदार संघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी मंडपाचे दर सादर करताना ते शासकीय दरानुसार न दाखविता कमी दराने दाखविल्याने त्यांना नोटीस काढण्यात आली होती. तसेच जळगाव मतदार संघातीलच भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या खर्चासंदर्भात निरीक्षण नोंद वहीनुसार खर्चाची नोंद नसल्याने त्यांना नोटीस बजावली होती तर जळगाव मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार अंजली बाविस्कर यांनी निवडणूक खर्चासाठी बँक खाते उघडले, मात्र त्या खात्यातून खर्च न करता स्वत: जवळील रोख रक्कम खर्च केल्याने त्यांना नोटीस काढण्यात आली. अशाच प्रकारे खर्चासंदर्भात विविध कारणांनी १९ जणांना नोटीस बजावल्या गेल्या. त्यानंतरही खर्च अथवा खुलासा सादर केला नाही म्हणून पुन्हा नोटीस बजावल्या. दुसºया तपासणीत रक्षा खडसे व डॉ. उल्हास पाटील यांच्या दैनंदिन नोंद वहीतील खर्च व निरीक्षण नोंदवहीतील खर्चात तफावत येत असल्याने नोटीस बजावल्या होत्या.निकालानंतर अंतिम ताळमेळउमेदवारांनी प्रचार बंद होण्यापूर्वीपर्यंत १८ एप्रिलपर्यंतचा खर्च निवडणूक खर्च विभागाला सादर केला आहे. या खर्चाची पडताळणी निवडणूक विभागाद्वारे करण्यात आली. प्रचार संपेपर्यंतचा खर्च किती झाला याचीही तपासणी होणार असून त्यासाठी जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरीक्षक पडताळणी करतील. निकाल लागल्यानंतर ३० दिवसात ही पडताळणी करावी लागणार असल्याचे खर्च शाखेच्यावतीने सांगण्यात आले.अधिकचा खर्च कसा झाला, याचा ताळमेळ उमेदवार व खर्च निरीक्षक यांच्यातील बैठकीनंतर होणार आहे.दुसºया व तिसºया तपासणीसाठी कळवूनही जळगाव लोकसभा मतदार संघातील राष्ट्रीय जनशक्ती पार्टीचे (सेक्यूलर) उमेदवार शरद गोरख भामरे (सुतार) यांनी नोटिसचा खुलासा सादर न केल्याने त्यांना नोटीस बजावली. या सोबतच ओंकार जाधव हे निवडणूक खर्च निरीक्षकांकडे तिसºया तपासणीसाठी हजर राहिले नाही, त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली.असा साधणार खर्चाचा ताळमेळलोकसभा निवडणुकीत उमेदवारांना ७० लाख रुपयांची खर्चमर्यादा आहे. त्याअनुषंगाने उमेदवार खर्च सादर करतात. मात्र, खर्च निरीक्षकांचे पथकदेखील उमेदवारांच्या खर्चाचे निरीक्षण करत असते व त्या अनुषंगाने निवडणूक दरपत्रकाद्वारे हा खर्च उमेदवारांच्या नावाने जमा करण्यात येतो. १८ एप्रिलपर्यंत तपासणी तर झाली आता या खर्चामध्ये तफावत आहे की नाही, या बाबत आता उमेदवार व पथक यांच्या समोरासमोर चर्चा होऊन ताळमेळ साधला जाणार आहे.उमेदवारांकडून १८ एप्रिलपर्यंत सादर खर्चाची पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. पहिल्या तपासणीवेळी तफावत आढळल्यानंतर त्यांना नोटीस काढल्या होत्या. २० रोजी जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक खर्च निरीक्षकांनी तिसरी तपासणी केली. आता निकालानंतर अंतिम पडताळणी होणार आहे.- प्रवीण पंडित, नोडल अधिकारी, निवडणूक खर्चयांच्या खर्चावर घेतला आक्षेपगुलाबराव देवकरउन्मेष पाटीलडॉ. उल्हास पाटीलरक्षा खडसेउमेदवार                खर्चडॉ. उल्हास पाटील 46,79,000गुलाबराव देवकर 44,43,000रक्षा खडसे 41,87,000उन्मेष पाटील 35,64,000अंजली बाविस्कर 3,31,000महाहंसजी महाराज 1,25,000मोहन बिºहाडे 71,000ईश्वर मोरे 69,000रुपेश संचेती 49,000ललित शर्मा 34,000अनंत महाजन 29,000शरद भामरे 26,000ओंकार जाधव 25,000मुकेश कुरील 21,000राहुल बनसोड 29,000सुभाष खैरनार 15,000

टॅग्स :Jalgaonजळगाव