शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

सातारा हिल मॅरेथॉन पूर्ण करणारे डॉ. हिराणी यांची गिनिज बुकात नोंद

By admin | Updated: March 20, 2017 00:26 IST

सातारा हिल मॅरेथॉन पूर्ण करणारे जळगावातील धावपटू तथा जळगाव रनर्स ग्रुपचे सदस्य डॉ. रवी हिराणी यांची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

जळगाव : तब्बल २१ कि.मी. घाट असलेली सातारा हिल मॅरेथॉन पूर्ण करणारे जळगावातील धावपटू तथा जळगाव रनर्स ग्रुपचे सदस्य डॉ. रवी हिराणी यांची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. गेल्या वर्षी १८ सप्टेंबर २०१६ रोजी सातारा येथे सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होेते. पाचवे वर्ष असलेल्या या मॅरेथॉनमध्ये ४०८१ स्पर्धक धावले होते. यात विविध भागातील स्पर्धक सहभागी झाले होते तर जळगावातून केवळ डॉ. रवी हिराणी यांनी सहभाग नोंदविला होता. १७०० फूट उंच घाटएरव्ही ज्या मॅरेथॉन होतात त्या सरळ जमिनीवर धावण्याच्या असतात. मात्र ही स्पर्धा होती ती घाट चढून धावण्याची. तब्बल १७०० फूट उंच असलेला हा घाट धावणे म्हणजे २१ कि.मी.चा चढ-उतार आहे. तसे पाहता विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणारे डॉ. हिराणी यांनी या हिल मॅरेथॉनमध्ये सहभागाचा निश्चय केला व ती पूर्णही केली. यासाठी झाली नोंदया स्पर्धेत एवढ्या मोठ्या (४०८१) प्रमाणात स्पर्धकांनी सहभाग घेतल्याने हा एक विक्रम ठरला. त्यामुळे या स्पर्धेतील स्पर्धकांची गिनिज वर्ल्ड रेकॉडमध्ये नोंद झाली व त्यात जळगावच्या डॉ. रवी हिराणी यांचा समावेश आहे. यशाचे श्रेयया यशाचे श्रेय जळगाव रनर्स गु्रपचे किरण बच्छाव, विक्रांत सराफ, अविनाश काबरा, नीलेश भांडारकर, नरेंद्रसिंग सोलंकी यांना असल्याचे डॉ. रवी हिराणी यांनी सांगितले. या शिवाय सरावासाठी मदत करणारे त्यांचा लहान बंधू यश हिराणी, ज्ञानेश्वर बढे यांनीही मदत केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. धावण्याची प्रेरणा पत्नी डॉ. ज्योती हिराणी यांच्याकडून मिळाल्याने मी धावू लागलो व इथपर्यंत पोहचल्याचे डॉ. हिराणी यांनी सांगितले. घाटामध्ये धावून केला सरावया मॅरेथॉनसाठी सराव आवश्यक असल्याने डॉ रवी हिराणी यांनी फर्दापूर ते अजिंठा दरम्यानचा घाट, पाल ते खिरोदा दरम्यानचा घाट धावून चढले तसेच विद्यापीठ परिसरातील चढ-उतारावर धावूनही त्यांनी सराव केला.