शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा अपूर्व उत्साह, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी लेझीम खेळून वाढविला कार्यकर्त्यांचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 13:15 IST

मिरवणुकांनी वेधले लक्ष

ठळक मुद्देअभिवादन सभा१२७ रोपट्यांचे रोपण

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १४ - महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहरासह जिल्ह्यात विविध संस्थांतर्फे शनिवारी मिरवणूक काढून शहरवारवासीयांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांनी हजेरी लावली. नीळे फेटेधारी युवक, युवती तसेच हातात नीळे झेंडे व जय भीमचा गजर... असे चैतन्यमय वातावरण होते.अभिवादन सभाजळगाव रेल्वे स्थानकाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी अभिवादन सभा झाली. सभेस माजी मंत्री सुरेशदादा जैन, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, सीईओ शिवाजी दिवेकर, माजी मंत्री गुलाबराव देवकर, महापौर ललित कोल्हे, आमदार सुरेश भोळे, गफ्पार मलिक, शिवचरण ढंढोरे, गणी मेमन, मुकुंद सपकाळे, अनिल अडकमोल, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हेदेखील मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी लेझीम खेळून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.१२७ किलोंचा कापला केकजळगाव येथे भिमराज गु्रपतर्फे रेल्वेस्टेशन परिसरात शनिवारी सकाळी ९ वाजता चिमुकल्यांच्याहस्ते १२७ किलोंचा केप कापण्यात आला़भिमराज ग्रुपतर्फे दरवर्षी डॉ़ आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केप कापण्यात येतो़ यंदा गु्रपचे सातवे वर्ष होते़ यावेळी गु्रपचे अध्यक्ष बबलू सावळे, अजय बागूल, विजय गायकवाड, रमेश सोनवणे, जुबेर खाटीक, भोला बिहारी आदी सदस्य उपस्थित होते़ चिमुकल्यांसह काही तरूणींनी निळे फेटे घालून केकसोबत सेल्फी काढली़ कार्यक्रमाच्या सुरूवातीस ग्रपतर्फे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले़१२७ रोपट्यांचे रोपणअजिंठा हाऊसिंग सोसायटी जळगावतर्फे भीम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून १४ एप्रिल रोजी सकाळी अजिंठा सोसायटी व शांती निकेतन सोसायटी येथे १२७ वृक्षांचे रोपण करण्यात आले.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीJalgaonजळगाव