शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

धर्मांतरासाठी आस्थेशी खेळू नका!, योगी आदित्यनाथ यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 09:10 IST

Yogi Adityanath :

- कुंदन पाटील जळगाव : सनातन हा मानवता धर्म आहे. सनातन धर्माशी छेडछाड केल्यास मानवी जीवनाशी खेळ सुरू होईल. त्यामुळे धर्मांतरासाठी आस्थेशी खेळ करू नका, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी दिला. सनातन धर्मामुळेच प्रत्येकाला सुरक्षेचे कवच आहे. त्यामुळे एकसंध भारताला कुणीही रोखू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.गोद्री (ता. जामनेर) येथे आयोजित अ. भा. हिंदू गोर बंजारा लभाना व नायकडा समाज मेळाव्याचा सोमवारी समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी योगगुरू रामदेवबाबा,  द्वारकापीठाधीश्वर शंकराचार्य सदानंदजी महाराज, रा. स्व. संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी, आयोजन समितीचे श्यामचैतन्य महाराज, वृंदावन धामचे गादीपीठ गोपाळचैतन्य महाराज, गोपालबाबा महाराज, बाबूसिंगजी महाराज यांच्यासह देशभरातील साधुसंत, महंत तसेच समाज नेते व्यासपीठावर उपस्थित होते. 

सनातन धर्माशी छेडछाड सहन करणार नाहीnबंजारा समाजाने या कुंभाच्या माध्यमातून प्राचीन सनातन धर्माच्या भूमीवर जन्म घेतल्याचे सिद्ध केले आहे. सनातन धर्मासोबत छेडखानी केल्यास मानवी जीवनाशी खेळ ठरणार आहे. nत्यामुळे धर्मांतराचा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही, हेच या कुंभातून सिद्ध झाले आहे, असेही योगी म्हणाले. सनातन धर्माच्या मूल्यांचेही जतन होणे अपेक्षित आहे. मात्र धर्माला छेद द्यायला निघाले असतील, तर त्यांना भोग भोगावेच लागतील, असा इशारा योगींनी यावेळी दिला. 

रामदेवबाबा म्हणतात, देशात दोन संविधान देश चालविण्यासाठी संविधान आवश्यक आहे. मात्र धर्माला जगविण्यासाठी सनातन संविधान आवश्यक आहे. त्यामुळे देशात दोन संविधान असल्याचे धक्कादायक विधान योगगुरू  रामदेवबाबा यांनी केले. हिंदू धर्म विश्व धर्म आहे. सनातन धर्माची ताकद आणि मूल्यांना कुणीही हात लावू शकत नाही. धर्मांतराची भीक स्वीकारू नका. आपला ‘डीएनए’ सनातन धर्माचा आहे. त्यामुळे आपल्या दंडातल्या ताकदीतून कर्तृत्व दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथHinduहिंदू