शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
5
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
6
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
7
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
8
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
9
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
10
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
11
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
12
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
13
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
14
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
15
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
16
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
17
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
18
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
19
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
20
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!

दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 15:34 IST

दान हे एक धर्मांचे प्रभावी अंग आहे. सत्प्रवृत्तीचा गृहस्थाश्रमी आपल्या कष्टाच्या कमाईतून काही तरी सत्कारणी लागावे म्हणून सारखा तळमळतो व आपल्या विचारांप्रमाणे यथाशक्ती दान करून माझी कष्टाची कमाई सार्थक झाली.

दातव्यमिती यद्यानं दीपते नुपकारणेदेश कालेच पात्रे तद्यानं सात्विकं स्मृतम ।। गीता अ. १७, श्लोक-२०.दान हे एक धर्मांचे प्रभावी अंग आहे. सत्प्रवृत्तीचा गृहस्थाश्रमी आपल्या कष्टाच्या कमाईतून काही तरी सत्कारणी लागावे म्हणून सारखा तळमळतो व आपल्या विचारांप्रमाणे यथाशक्ती दान करून माझी कष्टाची कमाई सार्थक झाली. काही तरी सत्कारणी लागली. याने माझ्या आत्म्याचे काही तरी हीत होईल म्हणून समाधान मानतो. कधी काळी यज्ञ, भांडारे, नगर भोजन, ब्राह्म भोज व लग्न मुंजी बंघनादि कार्यात हजारो लोकांच्या पक्ती उठत असत. मठ मंदिर आदी धार्मिक संस्थांना धन, धान्य, शेती दिली जाई. आजकाल भूदान, श्रमदान, संपत्ती दान आदी सारखे दान पुढे येत आहेत. पण या सर्वांच्या बुडाशी आपल्या अंतकरणात रुतलेले धार्मिक संस्कारच होय. दानाच्या सहाय्याने मोठमोठाले महत्त्वाचे राष्ट्रकार्य,धर्म कार्य चालू आहेत. दानाने चांगले कार्य ही केले व करीत आहे व दानाने वाईट कार्य ही केले व अजून ही करीत आहे, जसे या दानाने आळशी, ऐतखाऊ, ठग, राष्ट्रदोषी, धर्मद्रोही, निर्माण केले हे पण नाकारता येणार नाही. ज्याप्रमाणे पाणी ज्या भांड्यात टाकतो त्याला तसा आकार येतो. त्याप्रमाणे कार्यकर्ते जसे असतील तसे कार्याला वळण मिळते. त्याचप्रमाणे दान घेणारे व देणारे तसे दानाला स्वरुप प्राप्त होते. म्हणून दान देणारा जाणता असून श्रद्धाळू पाहिजे. निव्वळ धर्मभोळेपणा हानिकारक आहे.कर्तव्य बुद्धीने कार्याचे महत्त्व ओळखून देणे हे दान होय. त्याला पण तीन अटी आहेत. भगवान श्रीकृष्ण महाराज गीतेच्या १७ व्या अध्यायात सांगतात. १) देश २) काळ आणि ३) पात्र हे पाहून दान करावे. नाही तर केलेले दान व्यर्थ तर होतेच पण नानाविध समाज विघातक दोष उत्पन्न करते.-लेखक-कै.महंत आराध्य मुरलीधर शास्त्री,संकलन- वैशाली आराध्य,भुसावळ.