शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

इकडे टाळ्यांचा नाद़़़तिकडे जीवदानासाठी डॉक्टरांची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 12:46 IST

'जनता कर्फ्युु’त अवघड शस्त्रक्रीया यशस्वी, अन्य तिघांना वाचविले

जळगाव : आपत्कालीन स्थितीत शासकीय वैद्यकीय सेवा कशाप्रकारे एखाद्याला जीवदान देऊ शकते, याचा प्रत्यय रविवारी आला़ जनता कर्फ्युुमध्ये सर्व यंत्रणा ठप्प असताना सायंकाळी एकीकडे टाळ्यांचा गजर होत होता तर दुसरीकडे जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करून वराडसीम ता. भुसावळ येथील महिलेला जीवदान दिले़ यासह दोन महिला व एका बाळालाही या डॉक्टांराच्या चमूने वाचविले़वराडसीम येथील साठ वर्षीय महिला सकाळी सुमारास शेतात काम करीत होती़ अचानक या महिलेची गर्भपिशवी थेट अंगाबाहेर फेकली गेली़ हे दृश्य पाहून कुटुंबीय हादरले़ शरीरात विष पसरू नये म्हणून काही महिलांनी तात्पुरते उपचार केले व या महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परिस्थिती बिकट असल्याने तत्काळ या महिलेला जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले़तत्काळ रक्त केले उपलब्धशासकीय रूग्णालयातील स्त्री रोग विभागप्रमुख डॉ़ संजय बनसोडे, डॉ़ मिताली गोलेच्छा, डॉ़ आकाश कोकरे यांनी या महिलेची प्राथमिक तपासणी केली़ महिलेच्या शरीरातून रक्तस्त्राव झालेला असल्याने डॉक्टरांच्या या चमुनेच रक्त पिशव्यांची जमवाजमव केली़ अत्यावश्यक असल्याने अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांनीही या शस्त्रक्रियेला तत्काळ परवानगी दिली व डॉ़ मिताली गोलेच्छा, डॉ़ आकाश कोकरे, डॉ़ सुधीर पवनकर, डॉ़ शितल ताटे, डॉ़ कोमल तुपसागर यांनी या महिलेवर शस्त्रक्रीया केली़ सुमारे तास चालेली ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून या डॉक्टरांनी खऱ्या आपत्कालीन स्थितीत या महिलेचे प्राण वाचविले़असाही योगायोगजनता कफर्यू दरम्यान, नागरिक सायंकाळी ५ वाजता आपत्कालीन सेवा देणाऱ्यांचे टाळ्या, ताटल्या वाजवून आभार मानत होते़ नेमकी त्याच वेळी ही शस्त्रक्रीया केली जात होती़अशा स्थितीत सेवा देणाºयांचा खºया अर्थाने हा गौरव झाल्याच्या प्रतिक्रिया या शस्त्रक्रियेनंतर कुटुंबीय, डॉक्टर व कर्मचाºयांमधून उमटल्या़अन्य तिघांना वाचविलेजनता कर्फ्युच्या कालावधीतच झटके आलेल्या दोन महिला व अन्य एका महिलेचे सिझेरियन करून माता व बाळाचे प्राण वाचविण्यात या डॉक्टरांना चमूला यश आले़रजेनिवृत्तीनंतर गर्भपिशवी बाहेर पडण्याचे प्रमाण नगण्य आहे़ बºयाच स्त्री रोगतज्ज्ञांना असे रूग्ण त्यांच्या आयुष्यात पाहण्यास मिळत नाही, अशा दुर्मिळ केसमध्ये निदान व श्स्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे समाधान आम्हाला आहे़ कर्फ्यू म्हणजे ह्यकेअर फॉर यूह्ण आम्ही आपल्या सेवेत सदैव तत्पर आहोत़- डॉ़ संजय बनसोडे, विभागप्रमुख स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभाग.

टॅग्स :Jalgaonजळगाव