शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

प्राथमिक आरोग्य केंद्रांना डॉक्टर? देता का डॉक्टर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 9:07 PM

१५६ पैकी ५२ डॉक्टर एमबीबीएस : उर्वरित पदे कंत्राटी पद्धतीने भरली

जळगाव : प्राथमिक आरोग्य केंद्रांना एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्याचे गंभीर चित्र वर्षानुवर्षे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत कायम आहेत. अखेर डॉक्टरांची पदे भरण्यासाठी नियम शिथिल करून बीएएमस व कंत्राटी पद्धतीने भरती करून मनुष्यबळाचा मुद्दा सोडविण्यात आला आहे. जिल्ह्यातील १५६ डॉक्टरपैकी ५२ डॉक्टर हे एमबीबीएस आहेत. मात्र, जागा रिक्त नसल्याचे समाधान मात्र आरोग्य यंत्रणेला आहे.जिल्ह्यात आरोग्य केंद्रांमार्फत आरोग्य सेवा सुरळीत मिळावी, ग्रामीण भागात याचे जाळे विस्तारावे यासाठी पूर्ण मनुष्यबळ हा मुद्दा निकाली काढण्याचा आरोग्य यंत्रणेचा प्रयत्न होता. मात्र वैद्यकीय अधिकारी म्हणून एमबीबीएस डॉक्टरच उपलब्धच होत नव्हते. अखेर या नियमांमध्ये शासनाने शिथिलता आणल्यानंतर बीएएमस पदवीधारक डॉक्टरांनाही वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक देण्यात आली. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आता १०४ बीएएमएस डॉक्टर्स आहेत.जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र७७एमबीएस डॉक्टर्स५२रिक्तपदे०उपकेंद्रांमध्ये सीएचओजिल्ह्यात ३००पेक्षा अधिक उपकेंद्र असून, या उपकेंद्रांमध्ये सीएचओ अर्थात जनसमुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सध्यातरी आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची पदे रिक्त नसल्याचा दावा आरोग्य यंत्रणेकडून केला जात आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रावर किमान दोन डॉक्टर राहतील, अशी सुविधा असल्याचे सांगितले जात आहे.तालुकानिहाय डॉक्टरअमळनेर : बीएएमएस-१०, एमबीबीएस २भडगाव : बीएएमएस-८, एमबीबीएस २बोदवड : बीएएमएस-३, एमबीबीएस १भुसावळ : बीएएमएस-३, एमबीबीएस ५चाळीसगाव : बीएएमएस-१२, एमबीबीएस ७चोपडा : बीएएमएस-१, एमबीबीएस ४मुक्ताईनगर : बीएएमएस ६, एमबीबीएस २एरंडोल : बीएएमएस-५, एमबीबीएस १धरणगाव : बीएएमएस-७ , एमबीबीएस १जळगाव : बीएएमएस-६, एमबीबीएस ५जामनेर : बीएएमएस-१०, एमबीबीएस ४पाचोरा : बीएएमएस-९, एमबीबीएस १पारोळा : बीएएमएस-४, एमबीबीएस ४रावेर : बीएएमएस-७, एमबीबीएस ६यावल : बीएएमएस-५, एमबीबीएस ७

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव