शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बैठकांमध्ये केवळ कीर्तन करायचे का ? - जळगावात लोकप्रतिनिधींचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:38 IST

चार महिने होऊनही उपायोजना का नाही ? प्रशासनाला विचारला जाब

जळगाव : टेंडर निघून चार-चार महिने होऊनही उपाययोजना होत नाहीत, गेल्या बैठकीत काय निर्णय झाले त्यावर कार कार्यवाही झाली़ याची काहीच माहिती दिली जात नाही मग बैठकांमध्ये केवळ कीर्तन करायचे का? असा संतप्त सवाल लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला केला़कोरोना संदर्भात सोमवारी उपाययोजनांच्या आढाव्या संदर्भात नियोजन भवनात झालेल्या या बैठकीत लोकप्रतिनिधींनी भावना मांडल्या़ आमदार निधी देऊनही साहित्य येत नसल्याबाबत त्यांनी जाबविचारला़शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १२ व्हँटीलेटर्स आहेत़ मंगळवारपर्यंत ३४ व्हँटीलेटर्स येणार असून जुलै अखेरपर्यंत पूर्ण ६८ व्हँटीलेटर्स उपलब्ध होणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ़ जयप्रकाश रामानंद यांनी दिली़ रेकॉर्ड टायमिंगमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केल्याचे ते सांगत असतानाच खासदार उन्मेश पाटील यांनी त्यांना थांबवत हे डिले टायमिंग झाले आहे़ रेकॉर्ड नव्हे़ चार महिन्यांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे़ आणि अद्यापही पूर्ण व्हँटीलेटर्स आलेले नाहीत़ खासगी रुग्णालयांमध्ये दहा दिवसात डिजिटल एक्सरे आले़शासकीय महाविद्यालयात मात्र, आताही धुवून एक्सरे काढले जातात़ साहित्य अद्यापही आलेले नाही़ असे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला़ आमदार मंगेश चव्हाण यांनी अनेक ठिकाणी असुविधा असल्या मुद्दा मांडला़बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार शिरीष चौधरी, चंद्रकांत पाटील, चंदूलाल पटेल, मंगेश चव्हाण, संजय सावकारे, अनिल भाईदास पाटील, सुरेश भोळे, लता सोनवणे, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील आदी उपस्थित होते.नॉन कोविडसाठी शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय तसेच मोहाडी महिला रुग्णालयात नियोजन करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीसांगितले़रुग्णांना अद्यापही जागेवर सुविधा नाहीतअत्यव्यस्त रुग्णांना जागेवर सुविधा मिळत नसल्याने त्यांना उठून स्वच्छतागृहात जावे लागत आहे़ अशा स्थितीत काही रुग्णांचा मृत्यू झाला़ यासाठी बेड असिस्टंट नेमणार होतो, मात्र,कोणीही यायला तयार नसल्याचे अधिष्ठाता डॉ़ रामानंद यांनी सांगितले़ काही सामाजिक संस्थांकडून सहा लोक येतील, असे ते म्हणाले़चार ते पाच रुग्ण निगेटीव्ह असून पॉझिटीव्हचार ते पाच रुग्णांच्या बाबतीत त्यांना पॉझिटीव्ह म्हणून आधी दाखल करण्यात आले़ त्यांच्या परिवाराला रुग्णालयात आणण्यात आले व दुसऱ्या दिवशी तुमचा रिपोर्ट निगेटीव्ह आहे असे सांगून घरी सोडण्यात आले़ हा गंभीर प्रकार असून आपल्याकडे अशा रुग्णांची नावे आहेत, असा गौप्यस्फोट करीत या गंभीर प्रकाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी माजी पालकमंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केली़असे आहे मृत्यूचे विश्लेषण५० वर्षावरील १७० रुग्ण११२ रुग्णांना विविध व्याधी४७ रुग्ण ७१ वर्षाच्या पुढील७० रुग्ण हे ५१ त ६० वयोगटातील५३ रुग्ण हे ६१ ते ७० वयोगटातीलआधी महापालिकेच्या निविदांचे बोला: पालकमंत्र्यांनी आमदारांना थांबविलेआमदार सुरेश भोळे यांनी महापालिकेसंदर्भात कोविड उपाययोजनांच्या निधीबाबत विचारणा करताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना थांबवत 'महापालिकेत तुमची सत्ता असताना तुमचे सभापती तीन- तीन वेळा टेंडर रद्द करतात' त्याबाबतही बोला़ असा टोला लगावला़ यानंतर आयुक्त सतिष कुलकर्णी यांनाही पालकमंत्र्यांनी निविदांबाबत सविस्तर विचारणा केली़ या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत सेना- भाजपचे राजकारण चांगलेच रंगलेले आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव