जळगाव : मंत्री, खासदार, महापौर, नगरसेवक किंवा अन्य कुणी पदाधिकाºयाच्या दबावाखाली येऊन निवडणुकीत काम करू नका. कुणा एकाची बाजू घेऊन काम केल्याची तक्रार यायला नको. जर अशी तक्रार आली तर संबंधीतांवर कडक कारवाई केली जाईल, असा दम राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात बुधवारी सकाळी आयोजित महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक आढावा बैठकीत बोलताना केले.सहारिया म्हणाले की, निवडणूक नि:पक्षपाती व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी व मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दिले जाणार नाही यासाठी संबधित यंत्रणांनी निवडणूक कालावधीत आपले कर्तव्य नि:पक्षपातीपणे पार पाडावे. चुकीच्या गोष्टी घडणार नाहीत, याची काळजी घ्यावी. चुकीची गोष्ट घडत असताना दबावामुळे गप्प बसू नका किंवा असहाय्यता दाखवू नका असे आवाहन त्यांनी केले.
निवडणुकीत कुणा एकाची बाजू घेऊ नका : राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 20:13 IST
कुणी पदाधिका-याच्या दबावाखाली येऊन निवडणुकीत काम करू नका. कुणा एकाची बाजू घेऊन काम केल्याची तक्रार यायला नको. जर अशी तक्रार आली तर संबंधीतांवर कडक कारवाई केली जाईल, असा दम राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात बुधवारी सकाळी आयोजित महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक आढावा बैठकीत बोलताना केले.
निवडणुकीत कुणा एकाची बाजू घेऊ नका : राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया
ठळक मुद्देचुकीची गोष्ट घडत असताना दबावामुळे गप्प बसू नकाआपले कर्तव्य नि:पक्षपातीपणे पार पाडावे.कर्तव्यात हयगय करणाऱ्यास तत्काळ निलंबित करा