मृत्यूभोेज बंद, विवाहावर वायफळ खर्च नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:38 AM2019-03-25T11:38:38+5:302019-03-25T11:39:23+5:30

राज्यस्तरीय बैठक : दधिच समाजाचे निर्णय

Do not spend money on marriage, and do not spend any money on wedding | मृत्यूभोेज बंद, विवाहावर वायफळ खर्च नको

मृत्यूभोेज बंद, विवाहावर वायफळ खर्च नको

Next


जळगाव : महाराष्ट दधिच समाजाची राज्य कार्यकारिणीची बैठक येथे रविवारी पार पडली. यावेळी समाजाने मृत्यूभोज प्रथा बंद करावी, विवाहातील वायफळ खर्चावर मर्यादा आणाव्या आदी महत्वाचे ठराव यावेळी मंजूर करण्यात आले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी सत्यनारायण खटोड (जळगाव) हे होते. प्रमुख अतिथी म्हणून कार्याध्यक्ष उत्तमचंद हुमानिया (मुंबई), सहसचिव विनोद त्रिपाठी (जळगाव), कोषाध्यक्ष राघेश्याम दायमा ( शिरपूर), संघटनमंत्री विजय आसोपा (औरंगाबाद), महासभा सदस्यनरेंद्र जोशी (रतलाम),प्रशांत कुदाळ (उस्मानाबाद), राजेश दायमा (पुणे), दधिच महिला राष्ट्रीय प्रकोष्ठ अध्यक्षा विद्या व्यास (नागपूर), महाराष्ट्र महिला संघटनेच्या अध्यक्षा माया शर्मा (नागपूर), महाराष्ट्र युवती संघटनेच्या प्रमुख राखी व्यास (पुणे) यांची मुख्य उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी यावेळी समाजाचा विकास कसा साधता येईल, यावर विचारविनीमय केला. दधिच समाजसेवावविकास संस्था देखील स्थापन्याचा निर्णय झाला.दुर्बल घटकांच्या मदतीसाठी यासंस्थेमार्फत योजना राबविण्यासाठी ५० लाखापर्यंत निधी घोषित करण्यात आला. आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करणे,वैद्यकीय सुविधा पुरवणे, पुणे येथे ेविद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरु करणे, बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देणे, दधिच समाजाचे अ‍ॅप तयार करणे आदी विषयांवर चर्चा झाली.
दुसऱ्या सत्रात महिलांची विशेष बैठक झाली.अध्यक्षस्थानी राष्ट्रीय महासभेच्या कार्यध्यक्षा विद्या व्यास या होत्या. राज्य महिला संघटनेच्या अध्यक्षा माया शर्मा, उपाध्यक्षा प्रेमलता खटोड, खान्देश अध्यक्षा मनिषा दायमा, उपाध्यक्षा प्रियंका शर्मा, राखी व्यास यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी उत्तमचंद डुमनिया,सतीष दायमा,शंकर पलोड, कीर्ती दायमा,भगवती दायमा, मोहन खटोड, नारायण शर्मा, शाम दायमा, किरण दायमा आदींनी सहकार्य केले.

Web Title: Do not spend money on marriage, and do not spend any money on wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.