शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

क्षणिक आनंदासाठी कायदा मोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 00:17 IST

साकेगाव येथे शांतता समितीच्या बैठकीत डीवायएसपी गजानन राठोड यांचे आवाहन

भुसावळ, जि.जळगाव : सण-उत्सव हे आनंदासाठी व एकोप्यासाठी असतात. यात कायदा व सुव्यवस्था मोडून क्षणिक आनंदासाठी स्वत:वर गुन्हे ओढवून घेऊ नका व भविष्यात अडचण निर्माण होईल, असे वागू नका. सण उत्सवासाठी शांतता कमिटीची बैठक घेणे ही शोकांतिका आहे. सण-उत्सव वाहतूक एकात्मतेचा संदेश जाईल असेच वागा, असे प्रतिपादन भुसावळचे डीवायएसपी गजानन राठोड यांनी केले. साकेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात बुधवारी सायंकाळी झालेल्या शांतता समितीच्या सभेप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर कुंभार, उपसरपंच शकील पटेल, माजी सरपंच अनिल पाटील, जि.प.सदस्य रवींद्र पाटील, पोलीस पाटील राजू सपकाळे, माजी कृउबा सभापती संजय पाटील, ग्रा.पं.सदस्य माणिक पाटील, सुरेश पाटील, विजय पाटील, धनराज भोई, साबीर पटेल, संतोष भोळे, प्रमोद पाटील, दिलीपसिंग पाटील, रमजान पटेल, महेंद्र कुंभार, सुभाष कोळी, वासेफ पटेल, राहुल चौधरी सुभाष कोळी, उपस्थित होते.येणारा पोळा, मरिमाता यात्रोत्सव, गणेशोत्सव, दुर्गा देवी उत्सव सर्व सण एकोप्याने साजरे करा, कुणाच्याही भावना दुखवू नका. सन २०११ व २०१७ मध्ये पोळा सणाला गालबोट लागले होते. त्यामुळे युवकांवर प्रसंगी गुन्हे दाखल करण्यात आले होते. अशा पद्धतीने वागू नका, असे ही राठोड यांनी सांगितले.गाव आदर्श गावाच्या वाटेवर असून, गावात जणू छोटा भारतच समाविष्ट आहे. गावात ३३ जातीधर्माचे लोक गावात राहतात, हे नक्कीच गौरवास्पद बाब आहे. गावात सर्वच सण एखाद दुसरी घटना सोडल्यास गुण्या-गोविंदाने साजरी होतात. तसेच मुस्लीम समाजबांधवांची मशीद हिंदू बहुल भागात आहे हे याचे उत्तम उदाहरण आहे, अशी माहिती माजी सरपंच आनंदा ठाकरे यांनी दिली.साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बोंडे, सुरेश वैद्य, भीमदास हिरे, पो.हे.सुधाकर पाटील, पो.ना. विजय पोहेकर यांच्यासह सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पोळा सणात भाग घेणारे युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ