शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावकरांची पाडवा पहाट निनादली स्वर-तालाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 11:26 IST

अल्हाददायक पहाट गारवा... आकाशात उगवतीच्या रंगांची झालेली उधळण... आणि स्वर - तालाच्या चैतन्याने भारलेले वातावरण. चाळीसगावकरांची गुरुवारची पाडवा पहाट अशी स्वराविष्काराच्या श्रीमंतीने नटलेली होती.

चाळीसगाव, जि.जळगाव -  अल्हाददायक पहाट गारवा... आकाशात उगवतीच्या रंगांची झालेली उधळण... आणि स्वर - तालाच्या चैतन्याने भारलेले वातावरण. चाळीसगावकरांची गुरुवारची पाडवा पहाट अशी स्वराविष्काराच्या श्रीमंतीने नटलेली होती. बनारस घराण्याचे तबला वादक पंडित कालिनाथ मिश्रा, चाळीसगावचे सुपुत्र आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य पंडित विवेक सोनार यांच्या स्वर - तालाच्या जुगलबंदीने रसिक - श्रोते मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते, चाळीसगाव नगरपरिषदेच्या शताब्दी महोत्सवाचे. नगरिषदेच्या आवारात झालेल्या हा  स्वराविष्कार सोहळा प्रारंभापासूनच रंगत गेला. उत्तरोत्तर चाळीसगावकरांची टाळ्यांसह...क्या बात है...!ची दाद वातावरणात गुंजत राहिली.

अहिर भैरव राग अर्थात पुजेने सुरुवात झाली. बासरीच्या कर्णमधुर सुरावटींना तबल्याच्या ठेक्याने चढलेला स्वरसाज प्रत्येकाच्या मन ओंजळीत आनंदाची फुले ठेऊन गेला. रुपक तालात बांधलेल्या तीन तालातील रचनेलाही टाळ्यांची दाद मिळाली. भटियार रागातील रचना, धून आणि शेवटी झालेली 'ओम जय जगदीश हरे' आरतीने सांगता झाली. बासरीवर  हिमांशु गिंडे, राज सोनार आणि तानपु-यावर रितेश भालेराव यांनी साथसंगत केली. आमदार उन्मेष पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, संजय रतनसिंग पाटील, नितिन पाटील, विजया प्रकाश पवार, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन जितेंद्र वाघ यांनी केले. 

'बंद मुठ्ठी' ठेक्याने वेधले लक्ष

कालिनाथ मिश्रा यांनी बंद मुठ्ठीने तबल्यावर अप्रतिम तिरकिट वाजवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांचे हे  बंद मुठ्ठी तबला लालित्य कळसाध्याय ठरले. 

सवाई गंधर्व महोत्सवात गुंजणार 'स्वर विवेक'

यावेळी रसिक - श्रोत्यांशी संवाद साधतांना बासरीवादक पंडित विवेक सोनार यांनी चाळीसगावच्या मातीशी असलेले आपले ऋणानुबंध उलगडले. जन्मभूमीत कला सादर करायला नेहमीच आवडते असेही सोनार म्हणाले. त्यांना पुण्यात होणाऱ्या सवाई गंधर्व महोत्सवात यंदा बासरीचे सूर आळवण्याची संधी मिळाली असून १५ डिसेंबर रोजी पंडित विवेक सोनार हे महोत्सवात बासरी वादन करणार आहेत.

टॅग्स :DiwaliदिवाळीJalgaonजळगावmusicसंगीत