शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

पीक कर्ज शासनाच्या आदेशाला जिल्हा बँकेची केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 5:37 PM

सन्मान की अवमान : कर्जमाफ होऊनही खरीप पीक कर्जापासून वंचित शेतकऱ्याची मुख्यमंत्र्याकडे तक्रार

ठळक मुद्देथकबाकीदार दाखवून पीक कर्जापासून ठेवले वंचितकायदेशीर कारवाईस नकार

खेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : येथील रमेश काशिनाथ शिनकर यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीचा लाभ मिळूनही व्याज थकबाकी दाखवून जिल्हा बँकेने खरीप पीक कर्जापासून वंचित ठेवल्याने त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली आहे.दरम्यान, याप्रकरणी शासनाने सहकार आयुक्त पुणे व विभागीय सहनिबंधक नाशिक यांना शासनाचे आदेशाचे पालन न केल्याने जिल्हा बँकेवर कलम ७९ अ प्रमाणे कायदेशीर कारवाईचे आदेश देऊनही अधिकारी कारवाईस धजावत नसल्याने शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.शेतकरी रमेश शिनकर यांच्यावर सोसायटी कर्ज ६८ हजार ७४३ रुपये इतकी थकबाकी होती. त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, मात्र १ आॅगस्ट २०१७ पासून ते लाभ मिळेपर्यंतचे कर्जावरील व्याज आकारू नये, असे शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही शासन नियमाची सरळसरळ सोसायटी पर्यायी जिल्हा बँक पायमल्ली करीत शेतकºयाकडून व्याज आकारणी केली व व्याज न भरणाºयांना थकबाकीत दाखवून २०१८ च्या खरीप पीककर्ज चा लाभ दिला नाही, असे शेतकºयाने १८ जून रोजी मुख्यमंत्र्यांना दिले होते.शासन आदेशाप्रमाणे याआधी पीक कर्जाचे पुनर्गठण करणे, १० हजारांची उचल त्वरित देणे ,३१ जुलैनंतर व्याज आकारणी करू नये, पीक कर्जापासून वंचित ठेवू नये या शासन आदेशाची पायमल्ली करीत १३ मार्च २०१८ चा जी.आर.दाबून ठेवत शेतकरीविरोधी निर्णय जिल्हा बँक घेत असल्याचे शिनकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात लक्षात आणून दिले. त्यानंतर ३ सप्टेंबरला विभागीय सहनिबंधक नाशिक यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांना तत्काळ पत्र देत यासंदर्भात कार्यवाही करण्याचे व तसा अहवाल सहकार आयुक्त पुणे यांना सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जBhadgaon भडगाव