शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

एसीबीच्या गुन्ह्यात दोषसिध्दीत जिल्हा प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 11:47 IST

राज्यात तिसऱ्या स्थानी : सहा केसेसमध्ये आठ जणांना शिक्षा; दोन वर्षात अडकले ५७ सरकारी बाबू

सुनील पाटील ।जळगाव : भ्रष्टाचाराच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवायांमध्ये नाशिक परिक्षेत्रात सर्वाधिक शिक्षा जळगाव जिल्ह्याच्या गुन्ह्यात सुनावण्यात आल्या असून राज्यातही जळगाव जिल्हा तिसºया स्थानी आहे. चालू वर्षात सहा गुन्ह्यांमध्ये आठ जणांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. त्या शिक्षेचे प्रमाण ४७ टक्के इतके आहे. दरम्यान, २०१८ ते २०१९ या दोन वर्षाच्या कालावधीत ५७ सरकारी बाबू एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. कारवाया व शिक्षा या दोन्ही प्रकारात जळगाव जिल्हा विभागात अव्वल ठरला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे २८ आॅक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालवाधीत जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहांतर्गत शाळा, महाविद्यालये व सरकारी कार्यालयांमध्ये एसीबीने बॅनर्स व भीत्तीपत्रके लावली आहेत. भ्रष्टाचार कमी व्हावा व लोकांनी त्याविरुध्द आवाज उठवून एसीबीकडे तक्रार करावी यासाठीच हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांनी विभागाने केलेली दोन वर्षाची कारवाई व शिक्षेची प्रमाण याची माहिती ‘लोकमत’ ला सांगितली. यंदा सर्वाधिक लाचखोर महसूल विभागात आढळून आले असून त्याखालोखाल पोलीस विभागाचा क्रमांक आहे. गेल्या वर्षी ३० तर यंदा दहा महिन्यात २७ सरकारी बाबू एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.मुख्याधिकाºयापासून तर पोलीस शिपायापर्यंत दोषीन्यायालयाने लाचलुपतच्या केसेसमध्ये दोषी धरुन विविध कलमांखाली आठ जणांना दोषी धरुन शिक्षा सुनावली आहे. त्यात भडगाव नगरपालिकेच्या तत्कालिन मुख्याधिकारी स्नेहल सुधाकर विसपुते, रवींद्र महारु जाधव, कजगाव तलाठी धनराज भावराव मोरे, मेहुणबारे पोलीस स्टेशनचा कर्मचारी विजय श्रीराम पाटील, चाळीसगाव पंचायत समितीचा लिपिक शांताराम गोविंदा पाटील, जि.प.शिक्षण विभागचा वरिष्ठ सहायक विनायक वनजी बैसाने व चाळीसगाव वन विभागाचा वनपाल रघुनाथ रामदास देवरे यांचा समावेश आहे.एसीबी ट्रॅप... अब तक ५७लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात २०१८ पासून आजपर्यंत ५७ जण अडकले आहेत. त्यात महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, वन विभाग, परिवहन, शिक्षण समाजकल्याण, कृषी, मत्स विभाग यासह इतर विभागातील वर्ग ४ ते वर्ग १ च्या अधिकाºयापर्यंत समावेश आहे. यंदाही सर्वाधिक लाचखोर महसूलचेच सापडले असून त्याखालोखाल पोलीस विभागाचा क्रमांक आहे. तिसºया स्थानी महावितरण आहे. गेल्या वर्षी महसूल आणि पोलीस दोन्ही विभागातील लाचखोरांची संख्या सारखीच होती. यंदा तर जेथे न्यायाची अपेक्षा असते त्याच ग्राहक मंचात लाचखोरी उदयास आली.खासगी महाविद्यालयेही रडावरजातपडताळणी विभागामार्फत जातीचे प्रमाणपत्र वितरीत करताना जातपडताळणी विभाग व खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील खादाडांवरही एसीबीने कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यासह गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे अडथळे या विभागाने दूर केले आहेत. भुसावळ व जळगाव येथील दोन महाविद्यालयाच्या लिपिकांवर कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव