पाचोरा तहसील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत लाभार्थी सोनाबाई तडवी (शिंदाड), ललिता शेरे (रामेश्वर), गीताबाई राठोड (निंभोरी), प्रभावती नागणे (पाचोरा), समाधान दिवटे (निंभोरी), लता चव्हाण (निंभोरी), विमलबाई मोरे (दिघी), उषा धनगर (पाचोरा), पूनम नाईक (नगरदेवळा), अनिता बागुल (पाचोरा), इंदूबाई कुंभार (शिंदाड), उषाबाई अहिरे (कुऱ्हाड), वालाबाई अहिरे (सारोळा खु), सरलाबाई सुतार (लोहार), कल्पना न्हावी (अंतुर्ली खु), सीमा सावळे (पाचोरा), लताबाई सोनवणे (ओझर), कोकिळाबाई गायकवाड (चुंचाळे), आशाबाई गोसावी (सामनेर), लीलाबाई फासगे (नगरदेवळा) यांना प्रत्येकी २० हजार धनादेश देण्यात आला.
पाचोरा जेसीआयतर्फे कल्याणी काळे (बांबरुड राणीचे) या मुलीचे वडील, आजोबा यांचे कोरोनाने निधन झाल्याने शाळेसाठी सायकलची गरज होती. त्यानुसार जेसीआय संघटनेतर्फे आमदारांच्या हस्ते सायकल भेट देण्यात आली तर महसूल कर्मचारी संघटनेतर्फे आंबेवडगाव येथील दिनेश रायबा हटकर याचे आईवडील कोरोनाने मयत झाल्याने या निराधार विद्यार्थ्यास ऑनलाइन अभ्यासासाठी मोबाइल भेट देण्यात आला.
तौक्ते चक्रीवादळात घराचे नुकसान झाल्याने लोहारा येथील जयसिंग भिल या लाभार्थीस रु. १५ हजाराचा धनादेश देण्यात आला. यावेळी आ. किशोर पाटील, प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार कैलास चावडे, नायब तहसीलदार मोहन सोनार, पुरवठा नायब तहसीलदार पूनम थोरात, सं. गा. नायब तहसीलदार बी.डी. पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख किशोर बारावकर, तालुकाप्रमुख शरद पाटील उपस्थित होते.