शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी नाकारल्याने जळगावात भाजपातील निष्ठावंतांमध्ये असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 23:32 IST

जळगाव मनपा निवडणुकीत पक्षांतराचे धमाके अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरु राहिले. मोठ्या संख्येने उमेदवार आयात झाल्याने भाजपातील मूळ कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

ठळक मुद्देपृथ्वीराज सोनवणे यांचा राजीनामाअनेक बंड पुकारण्याची शक्यताआयात उमेदवारांमुळे निष्ठावंतांमध्ये नाराजी

जळगाव- मनपा निवडणुकीत पक्षांतराचे धमाके अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरु राहिले. मोठ्या संख्येने उमेदवार आयात झाल्याने भाजपातील मूळ कार्यकर्ते नाराज झाले आहेत. यामुळेच नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी आपल्या सर्व पदांचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा महानगराध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांच्याकडे बुधवारी सकाळी १० वाजता दिला. यानंतर लगेचच शिवसेनेतर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आली.भाजपाचे विद्यमान नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. की, मी पक्षाचा गेल्या २५ वषार्पासून एकनिष्ठ होतो. नगरसेवक म्हणून मी मनपात सर्वात चांगले काम केले असे वाटते. तरी सुध्दा आपण म्हणजे भाजपाने मला तिकीट दिले नाही म्हणून मी भाजपाच्या सर्व आघाडीवर असलेल्या पदाचा, सदस्यपदाचा राजीनामा देत आहे.भाजपात अनेकांची नाराजीभाजपा केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सत्तेत असल्याने पक्षाची विविध निवडणुकांमध्ये जिल्ह्यात शक्ती वाढली आहे. अशा स्थितीत यंदा मनपा निवडणुकीतही निश्चितच गत वेळेपेक्षा स्थिती सुधारेल,हे गृहीत धरुनच मिशन ५० प्लसचे लक्ष घेवून अनेक कार्यकर्ते जोमाने कामाला लागले होते. उमेदवारी मिळणार या आशेने अनेकांनी घरोघर संपर्क साधत प्रचाराला देखील सुरूवात केली होती. मात्र ऐनवेळी भाजपाने आयात उमेदवारांना उमेदवारी दिल्याने अनेक एकनिष्ठ कार्यकर्त्यांची उमेदवारी कापली गेल्याने या कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस वाढली आहे.अनेक बंड पुकारण्याची शक्यतामाजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे हे मनपा निवडणुकीपासून दूर असले तरी भाजपातील नाराज गटाने त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. काही नाराज कार्यकर्ते बंड पुकारण्याची शक्यता आहे.

टॅग्स :BJPभाजपाJalgaonजळगाव