शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राष्टÑवादीत अंतर्गत कलह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:54 IST

महानगरसाठी जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीला काही जणांनी ‘गूपचूप’ विरोध केला

चंद्रशेखर जोशीजळगाव : जिल्ह्याच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना आक्रमकपणे तोंड देणारा पक्ष म्हणून तुर्तास राष्टÑवादी कॉँग्रेस या पक्षाकडे बघितले जाते. पक्षात नुकतेच काही बदल होऊन जिल्हाध्यक्ष म्हणून अ‍ॅड. रवींद्र पाटील तर महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून नामदेव चौधरी यांची निवड झाली. निवड झाल्यानंतर महानगर राष्टÑवादी कॉँग्रेसने शहरात संघटन उभे करून सरकार विरोधात काही आंदोलने केली. या आंदोलनांना पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही दाद दिली. मात्र यानंतर महानगरसाठी जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीला काही जणांनी ‘गूपचूप’ विरोध केला व संपर्क प्रमुख दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकारिणी स्थगित केली. अंतर्गत कलहातूनच हे प्रकार सुरू असल्याचे आता लक्षात येत आहे.सोनिया गांधींना विरोध करत कॉँग्रेसमधून खासदार शरद पवार यांच्या बरोबर राज्यातील एक मोठा गट बाहेर पडला. जळगाव जिल्ह्यातही मोठी पडझड त्यावेळी झाली. कॉँग्रेसचे म्हणून ओळख असलेल्या बºयाच नेत्यांनी या पक्षाला रामराम करत राष्टÑवादीचे घड्याळ हाताला बांधले. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये या पक्षाने बºयापैकी यश मिळविले. एकेकाळी राजकीय क्षेत्रात दबदबा असलेले अरूणभाई गुजराथींसारखे नेते या पक्षाबरोबर पहिल्यापासून आहेत. यासह भाजपातून दुखावलेली काही मंडळीही या पक्षाबरोबर होती. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाला यश मिळाले. राज्यात सत्ता मिळून पक्षाचे जळगाव ग्रामीण मतदार संघाचे तत्कालीन आमदार गुलाबराव देवकर यांना राज्यमंत्रीपद मिळाले. परिवहन, कृषी राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे होते. यासह जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी आली. सत्ता तिकडे वळायचे ही राजकीय क्षेत्रातील अनेकांची भूमिका असते. त्यानुसार सत्ता आल्याने राष्टÑवादी कॉँग्रेसकडे अनेक हौशी मंडळी वळली. पक्षाच्या कार्यालयात पाय ठेवायला जागा नसायची, अशीही परिस्थिती सत्ता होती त्या काळात दिसून येत असे. २०१४ पर्यंच्या निवडणुकीपर्यंत हीच स्थिती होती. त्यानंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या पक्षाला अपयश आले. केवळ पारोळा-एरंडोल विधानसभा निवडणुकीत डॉ. सतीश पाटील हे निवडून आले. त्यानंतर त्यांच्याकडे पक्षाचे जिल्हाध्यक्षपद सोपविले. आता येणाºया विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सतीश पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदावर राहण्यास नकार दिला. त्यानंतर पक्षाने जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड. रवींद्र पाटील व महानगर जिल्हाध्यक्षपदी नामदेव चौधरी यांची निवड केली. या दोघांनी पदास साजेशी आंदोलनेही केली. मात्र महानगर कार्यकारिणी जाहीर केल्यावर अंतर्गत कलहाचीच प्रचिती आली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव