शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आर.आर.च्या प्रभारी मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 20:17 IST

माध्यमिक शालांत परीक्षे दरम्यान आर.आर.विद्यालयात झालेल्या गैरप्रकाराला केंद्रसंचालक तथा प्रभारी मुख्याध्यापिका विजया काबरा यांना जबाबदार धरून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी असे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव नितीन बच्छाव यांनी दिले आहे.

ठळक मुद्देआर.आर.विद्यालयातील परीक्षा गैरप्रकार प्रकरणचार सदस्यीय समितीने सादर केला अहवालपरीक्षेतील गैरप्रकाराला जबाबदार धरीत दिले आदेश

जळगाव : माध्यमिक शालांत परीक्षे दरम्यान आर.आर.विद्यालयात झालेल्या गैरप्रकाराला केंद्रसंचालक तथा प्रभारी मुख्याध्यापिका विजया काबरा यांना जबाबदार धरून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी असे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव नितीन बच्छाव यांनी दिले आहे.आर.आर.विद्यालयात माध्यमिक शालांत परीक्षेत १४ मार्च रोजी झालेल्या विज्ञान भाग एक या विषयाच्या पेपरला गैरमार्ग झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार चौकशीसाठी चार जणांची समिती नियुक्ती केली होती. त्यात नाशिक विभागीय मंडळाचे सहा.सचिव वाय.पी.निकम, सहसचिव एम.व्ही.कदम, धुळे शिक्षणाधिकारी पी.व्ही.अहिरे, नाशिक शिक्षणाधिकारी (निरंतर) एस.जी.मंडलिक यांचा समावेश आहे. या समितीने २४ मे २०१८ रोजी अहवाल सादर केला होता.चौकशी अहवालानुसार आर.आर.विद्यालयातील परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक विजया कैलासचंद काबरा यांनी परीक्षा गोपनियतेचा भंग होऊ नये म्हणून कॅमेरे कपड्याने झाकल्याचे कबुल केले. परीक्षा कालावधीत कॅमेरे झाकण्याची आवश्यकता नव्हती. केवळ ड्रॉर्इंग हॉलमधील कॅमेऱ्यावरील कपडा खाली पडल्याने तेथील गैरप्रकार उघडकीस आला. परीक्षा केंद्रावरील गैरप्रकाराचे चित्रीकरण होवू नये म्हणून कॅमेरे कपड्याने झाकल्याचे स्पष्ट झाल्याचा निष्कर्ष समितीने नोंदविला आहे. या गैरप्रकाराला केंद्रसंचालिका तथा प्रभारी मुख्याध्यापिका विजया काबरा या जबाबदार असल्याने त्यांच्यावर एम.ई.पी.एस. नियमावली १९८१ नुसार शिस्तभंगाची कारवाई करून त्याबाबतचा अहवाल मंडळ कार्यालयास तत्काळ पाठवावा असे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव नितीन बच्छाव यांनी केले दिले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव