जळगाव : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत नुकताच उन्हाळी परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची उन्हाळी परीक्षा जुलै-ऑगस्ट महिन्यात घेण्यात आली होती. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होऊन ती सुरळीत पार पडली होती. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रथम श्रेणी प्राप्त करून उत्तीर्ण होणाऱ्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ ९५ टक्के आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य डॉ़ पराग पाटील, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
असा आहे निकाल
यंत्र अभियांत्रिकी विभागात रितेश पाटील हा ९६.२६ टक्के मिळवून पहिला आला आहे. द्वितीय नीरज झोपे (९६.०५ टक्के), तृतीय वैभवी चंदनकर (९५.७९ टक्के) ठरली आहे. अंतिम वर्ष (द्वितीय पाळी) - गौरव जैन (९५.१५ टक्के), समीर शाह (९४.६७ टक्के), मोहित राणे ९४. १० टक्के मिळवून उत्तीर्ण झाला आहे. तसेच स्थापत्य अभियांत्रिकी विभागात (पहिली पाळी) प्रथम - उमेश विश्वासराव बोरसे (९७.३७ टक्के), द्वितीय मिताली टोके (९७.२६ टक्के), तृतीय रोहित भामरे (९७.२१ तृतीय), अंतिम वर्ष द्वितीय पाळीमध्ये प्रथम - समृद्धी बावसकर (९५.७९ टक्के), द्वितीय तेजस्विनी मोरे (९५.४२ टक्के), तृतीय जानव्ही पाटील (९५.३२ टक्के) ठरली आहे. संगणक अभियांत्रिकी विभागात प्रथम आदित्य बोधनकर (९५.८३ टक्के), द्वितीय अजिंक्य महाजन (९५. ६० टक्के), तृतीय शिवानी महाजन (९५. ३३ टक्के) ठरली आहे़ अणुविद्युत अभियांत्रिकी विभागातील मंदार पाटील (९५.३४ टक्के), प्रथमेश सराफ (९५.१२ टक्के), महेश खडसे (९५ टक्के), विद्युत अभियांत्रिकी विभागातील गणेश पाटील (९७.३३ टक्के), प्रियदर्शिनी असमार (९७.२२ टक्के), प्रथमेश अत्रे (९६.२८ टक्के), माहिती व तंत्रज्ञान अभियांत्रिकी विभागातील साक्षी तिवारी (९३. ९४ टक्के), आर्यन पाटील (९४. ३१ टक्के), परेश अपराज (९३. ५० टक्के) तसेच फार्मसी विभागातील रूपाली काळे (९६.८० टक्के), निर्मला वराडे (९६.७०टक्के) तर दीपक मधुकर चौधरी (९६.५० टक्के) मिळवून उत्तीर्ण झाला आहे.