शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगरात सुरु झाला पशुधन खरेदी-विक्रीचा डिजीटल व्यापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 16:57 IST

खरेदी-विक्रीसाठी येणाºया पशुधनाची बाजारातील आवक ३० टक्यांनी घटली

ठळक मुद्देपशुधन विक्रीसाठीच्या वाहतुकीसाठी खर्चात होतेय बचतजागेवर व्यवहार होत असल्याने पशुमालक व खरेदीदार यांच्या वेळेची व पैशांची बचतडिजिटल व्यवहारामुळे ३० टक्के आवक घटली

मतीन शेख /आॅनलाईन लोकमतमुक्ताईनगर, दि.२१ : पशुधनाच्या वाहतुकी दरम्यान होणारे वाद, येण्याजाण्याचा होणारा संभाव्य खर्च आणि हायटेक तंत्राचा वापर यामुळे मुक्ताईनगरात पशुधन विक्रीचा व्यवहार डिजिटल झाला आहे. यामुळे गुरांच्या बाजारात गुरांची संख्या ३० टक्यांनी कमी झाली आहे.गुरांच्या बाजारातील व्यवहारात लोकांसमक्ष हातावर रूमाल टाकून बोटांच्या सांकेतिक हालचालीवर खरेदी विक्री चा व्यवहार करून देणारे व्यापारी आता व्यवसायासाठी सोशल मिडीयाचा वापर करू लागले आहे. सोशल मीडियाच्या वापराने आता पशुधन सेकंदात खरेदीदार शेतकºयांच्या मोबाईलवर झळकतात आणि बसल्या जागेवरून व्यवहार पार पडत आहे. हा डिजिटल गुरांचा व्यापार शेतकºयांच्या आवडीचा विषय बनला आहे.शेतकºयांना पशुधन खरेदी विक्री करायची असेल तर परिसरात भरणाºया गुरांच्या आठवडे बाजाराची प्रतिक्षा करावी लागत असे. बाजारात जादाचे पशुधन पहायचे असेल तर लांबचा प्रवास करून गुरांच्या यात्रेचा पर्याय शोधावा लागत असे. मात्र सोशल मिडीयामुळे खरेदी-विक्री सोपी झाली आहे.हातावर रुमाल टाकून गुरांचा व्यापारगुरांचा आठवडे बाजार म्हटला तर पंचक्रोशीतील आलेले पशुधन त्या साठी व्यवहार करून देणारे गुरांचे दलाल वजा व्यापारी शिवाय व्यवहार पूर्णच होत नाही. शेकडो लोकां समक्ष व्यवहार घडविण्यासाठी फारसी भाषा व हातावर रूमाल टाकून होणारा व्यवहार प्रचलित आहे. सध्या शहरी भागात वेगवेळ्या पाळीव प्राणी व पक्ष्यांची पैदास किंबहुना पिल्ल आदी व्हाट्स अ‍ॅप आदी माध्यमातून विक्री प्रचलित आहे. मात्र शेती उपयोगी व दुधाळ पशुधनाची आॅनलाईन विक्री बाबतचे मोबाईल अ‍ॅप्स् सध्या अस्तित्वात नाही.परराज्यातील पशुधनाची खरेदी-विक्रीहरियाणा मध्ये दुधाळ म्हशींची आॅन लाईन खरेदी - विक्री होत आहे. व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून दलाल व व्यापारी राज्य व परराज्यात पशुधनाचे फोटो परस्परांना पाठवून बसल्या जागेवरून पशुधन खरेदी विक्री करून देत आहे. व्यापारी थेट विक्रीस असलेले पशुधन मालकाकडे जाऊन बैल व म्हशीचे फोटो सोशल मीडियाच्या साहाय्याने खरेदीदार शेतकºयांस पाठवतो. दोघांची पसंती ठरल्यास जागेवरूनच व्यवहार पूर्ण होतो. संबधित बाजाराची व्यवहार पावती करून विक्री झालेले पशुधन थेट खरेदी करणाºया शेतकºयांच्या दारावर पोहोचते केले जाते.गुरांच्या बाजारातील ३० टक्के आवक घटलीया डिजिटल व्यवहारामुळे गुरांच्या आठवडे बाजारात विक्रीसाठी येणाºया पशुधनाची संख्या ३० टक्क्यांनी घटली आहे. पशुधन विक्रीसाठी वाहतुकीचा खर्च टाळण्यासाठी आता शेतकरी दलाल व व्यापारी लोकांना घरीच बोलवतात खुट्यावरील पशुधन दाखवून डिजिटल व्यवहारालाच पसंती देत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावMuktainagarमुक्ताईनगर