प्रमोद ललवाणीकजगाव, ता.भडगाव : येथील बसस्थानक परिसरात रात्री उभ्या असलेल्या वाहनातून गेल्या तीन दिवसांपासून डिझेल चोरी होत असल्याने वाहनधारकात घबराट पसरली आहे, तर शेजारील एक किलोमीटर अंतरावरील भोरटेक, तांदूळवाडी गावात महिलेसोबतच मुलीचा गळा दाबत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या चोरट्यांनी केला. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे.येथील बसस्थानक भागात उभ्या असलेल्या मालवाहू वाहनातून गेल्या तीन दिवसांपासून डिझेलच्या टाकीतून नळीद्वारे डिझेलची चोरीचा सुळसुळाट सुरू झाला आहे. दि.४ रोजी रफीक मुनाफ बागवान यांच्या वाहनांतून अंदाजे ९० ते ९५ लीटर, संजय चिंधा मांडोळे यांच्या वाहनातून ९० लीटर, दि.५ रोजी योगेश साहेबराव महाजन यांच्या वाहनांतून ५५ ते ६० लीटर, श्याम वाणी यांच्या वाहनातून २५ ते ३० लीटर, आबा महाजन यांच्या गाडीची बॅटरी व २० ते २५ लीटर, दि.६ रोजी बबलू चौधरी यांची गाडी येथील शिवशक्ती मोटर गॅरेजमध्ये कामाला लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी आपले काम दाखवत या वाहनांतून १८५ ते १९० लीटर डिझेल लांबविले. नदीम अहमद मण्यार यांच्या वाहनांतून ६० लीटर अशा पद्धतीने गेल्या चार दिवसांपासून चोरट्यांनी डिझेल चोरीचा सुळसुळाट मांडला आहे. सात वाहनातून ४२ ते ४३ हजार रुपये किमतीचे साडेपाचशे लीटर डिझेल व १० हजारांची बॅटरी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. याबाबत शिवशक्ती मोटर गॅरेजचे मालक वाल्मीक मिस्तरी यांनी भडगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.दरम्यान, कजगावपासून एक किलोमीटरवर असलेल्या भोरटेक येथील चंदनपुरी भागात चार पाच दिवसांपूर्वी रवींद्र रमेश शितोळे, प्रकाश बाबूराव पाटील, नाना देवीदास नाईक या तीन ठिकाणी घराचे दरवाजे उघडून यातील तिन्ही ठिकाणांवरून मोबाईल लांबविले, तर आबाजी हिरामण पाटील यांचा बोकड लांबविला. घरात झोपलेली मुलगी अचानक जागी होताच अज्ञात चोरट्यांनी तिचा गळा दाबत दहशत निर्माण केली. तेथून चोरीचा मोबाईल व बोकडसह पळ काढला. तेथून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या तांदुळवाडी येथील कजगाव चाळीसगाव मार्गालगत असलेल्या मठ भागात दीपक नाईक यांच्याकडे चोरीचा प्रयत्न केला. मात्र अंगणात झोपलेल्या महिलेस जाग आल्याने या महिलेचा गळा दाबत नखाने ओरबाडत दहशत निर्माण करत तेथून खाली हाताने पळ काढला. अशाप्रकारे गेल्या पाच सहा दिवसांपासून कजगाव, भोरटेक, तांदुळवाडी मठ भागात चोरट्यांनी कहर केला आहे.
कजगावात डिझेल चोरट्यांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 16:15 IST
बसस्थानक परिसरात रात्री उभ्या असलेल्या वाहनातून गेल्या तीन दिवसांपासून डिझेल चोरी होत असल्याने वाहनधारकात घबराट पसरली आहे,
कजगावात डिझेल चोरट्यांचा सुळसुळाट
ठळक मुद्देशेजारील भोरटेकमधून तीन मोबाईल व एक बोकड लांबविलेमहिलेसह बालिकेचा गळा दाबत दहशत माजविण्याचा प्रयत्न