शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 19:06 IST

भारताने संविधान स्वीकारले मात्र देशात आजही जाती, धर्माच्या भिंती कायम आहेत. संविधान जाळण्यापर्यंत काही शक्तींची मजल गेली असून देश हुकूमशाहीकडे वाटचाल करीत असल्याचा आरोप प्रसिद्ध लोकशाहीर, संगितकार संभाजी भगत यांनी केला. 

ठळक मुद्देलोकशाहीर संभाजी भगतसंगिताच्या माध्यमातून जनतेपर्यंत संविधान पोहचविण्याचा प्रयत्नलोकमत मुलाखत

विकास पाटीलजळगाव : भारताने संविधान स्वीकारले मात्र देशात आजही जाती, धर्माच्या भिंती कायम आहेत. संविधान जाळण्यापर्यंत काही शक्तींची मजल गेली असून देश हुकूमशाहीकडे वाटचाल करीत असल्याचा आरोप प्रसिद्ध लोकशाहीर, संगितकार संभाजी भगत यांनी केला. लेवा एज्युकेशन युनियनच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेसाठी ते जळगावात आले असता ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.  

भारतीय नागरिक म्हणून ओळख आजही पूसट ते म्हणाले, देश स्वतंत्र झाला. भारताने संविधान स्वीकारले. मात्र हे संविधान जनतेपर्यंत पोहचू नये यासाठी काही शक्ती प्रयत्न करीत आहेत. त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी मी संगिताच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे झाली तरी जाती-पातीच्या भिंती कायम आहेत. त्या गळून पडणे आवश्यक होते व भारतीय नागरिक म्हणून आपली ओळख निर्माण झाली पाहिजे होती. मात्र आपले दुदैव. भारतीय नागरिक म्हणून ओळख आजही पूसट आहे. हे अत्यंत भयावह व हादरुन टाकणारे वास्तव आहे. 

धर्मराष्टÑ झाल्यास देशाचे तुकडे होतीलसंभाजी भगत म्हणाले, या देशात काही संविधान विरोधी शक्ती कार्यरत असून संविधान जाळण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. काळाच्या पडद्याआड गेलेल्या काही गोष्टी समोर आणून वातावरण दूषित करण्याचे काम येथे सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचा पाया मजबूत करण्यासाठी खूप प्रयत्न केले. हा पाया उद्ध्वस्त करण्याचे कटकारस्थान काही देशविघातक शक्तींकडून सुरु आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्यास हे राष्टÑ धर्मराष्टÑ होईल व नंतर ते फुटेल आणि देशाचे मोठे नुकसान होईल.जनतेपर्यंत संविधान पोहचविण्याचा प्रयत्न आपल्या देशात विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने वास्तव्य करीत आहेत. मात्र हे लोक एकत्र राहू नये देशात दूही निर्माण  व्हावी यासाठी काही मंडळींकडून प्रयत्न केले जात आहेत. पाकिस्तानची जी अवस्था आहे, तशीच आपल्या देशाचीही व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. मात्र त्यांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी मी संगिताच्या माध्यमातून एक राष्टÑभक्त म्हणून काम हाती घेतले आहे.  जनतेपर्यंत संविधान पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. संगिताच्या माध्यमातून लवकर जनतेपर्यंत पोहचता येत आहे. नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे संभाजी भगत म्हणाले.