शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला पेटवून देत निवृत्त सैनिकाची रेल्वेखाली आत्महत्या, मात्र चिमुरडीचा नाहक बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 11:10 IST

पत्नी व मुलीला जिवंत पेटवून देत पतीनं स्वतः रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

- संजय पाटीलअमळनेर (जळगाव) - पत्नी व मुलीला जिवंत पेटवून देत पतीनं स्वतः रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमळनेर येथील प्रताप मिल कम्पाऊंड परिसरामधील हा धक्कादायक प्रकार आहे. सरिता अनिल खैरनार (वय 33 वर्ष) या महिलेला तिचा पती अनिल खैरनारनं पेट्रोल ओतून पेटवलं. या घटनेत सरिता व त्यांची पाच वर्षांची चिमुकली तनुजा गंभीररित्या जखमी झाल्या. यानंतर स्वतः अनिल खैरनारनं मालगाडी खाली उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, जखमी मायलेकींना धुळ्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान चिमुकल्या तनुजाचा मृत्यू झाला.  बुधवारी (9 मे) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अनिल खैरनार निवृत्त सैनिक होते. ते मूळचे शिंदखेडा येथील दुसानेमधील (धुळे) रहिवासी होते. पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास त्यानं पत्नी सरिता झोपेत असताना तिच्या गळ्यावर चाकूनं वार केला. वेळीच जाग आल्यानं सरितानं त्यास प्रतिकार केला. मात्र हातात असलेल्या बाटलीत पेट्रोल अनिलनं सरिताच्या अंगावर ओतले व पेटवले. हा प्रकार पाहून पाच वर्षांच्या तनुजानं आईकडे धाव घेतली व तीदेखील यात गंभीर जखमी झाली.

घटनेनंतर दोघींना अमळनेरमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.  सरिता 42 टक्के तर तनुजा 90 टक्के भाजल्याने प्रथमोपचार करून त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे सरितावर उपचार करण्यात आले. तिच्या गळ्याला 20 टाके पडले असून तिथे धुळे पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला. यानंतर दोघांनी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र पाच वर्षीय तनुजाचा उपचारादरम्यान मृत्यू  झाला. पत्नीच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या अनिल खैरनार लगेचच घरातून पसार झाला व त्यानं रेल्वे मालगाडी खाली उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, अनिल खैरनारनं केलेल्या कृत्याचा पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :MurderखूनJalgaonजळगाव