शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या ताब्यावरून भोईटे-पाटील गटात धुमश्चक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 20:11 IST

दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक

ठळक मुद्देजमिनीवर पाडून लाथाबुक्यांनी जबर मारहाणपाच जखमी, चार ताब्यात

जळगाव : मराठा विद्या प्रसारक संस्था अर्थात ‘मविप्र’चा ताबा घेण्याच्या कारणावरुन भोईटे व नरेंद्र पाटील गटात सुरु असलेला वाद मंगळवारी जोरदार उफाळून आला. दुपारी चार वाजता दोन्ही गटाकडून एकमेकावर तुफान दगडफेक झाली. त्यात पाच जण जखमी झाले. एका जणाला रस्त्यावर आडवा पाडून १५ ते २० जणांच्या जमावाने लाथाबुक्यांनी प्रचंड मारहाण केली. दरम्यान, प्रचंड जमाव झाल्याने त्यांना हटविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.या कारणावरुन उफाळला वादतहसीलदार अमोल निकम यांच्या आदेशाने नरेंद्र पाटील गटाने रविवारी संस्थेचा ताबा घेतला. त्यानंतर सोमवारी तहसीलदारांनी पुन्हा नवीन आदेश काढून जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेवर ताबा घेण्याविषयी आपण कोणतेही आदेश दिलेले नसल्याचे त्यात म्हटले आहे. या आदेशाची प्रत जिल्हा पेठ पोलिसांना देण्यात आली. २४ तासात दोन वेगवेगळे आदेश झाल्याने संभ्रमाचे वातावरण झाले. त्यामुळे भोईटे गट मंगळवारी सकाळपासूनच संस्थेच्या आवारात दाखल झाला. भोईटे गटाचे कार्यकर्ते आल्याचे समजताच नरेंद्र पाटील गटाचेही संचालक व कार्यकर्ते महाविद्यालयात दाखल झाले. संभाव्य वाद लक्षात घेता पाटील गटाने संस्थेच्या कार्यालयाला दोन्ही बाजुंनी कुलुप लावले. हा प्रकार समजल्यानंतर भोईटे गटाच्या काही जणांनी मुख्य रस्त्यावरील कार्यालयाच्या दरवाजाला सील लावून साखळदंडाने दुसरे कुलूप लावले अन् तेथेच वादाची ठिणगी पडली.दगडफेकीला सुरुवात होताच दोन गट भिडलेन्यायालय रस्त्यावरुन भोईटे गटाच्या एका जणाने संस्थेच्या कार्यालयावर दगडफेक केली. हा प्रकार पाहिल्यानंतर बाहेर थांबलेल्या पाटील गटाच्या समर्थकांनीही दगडफेक करायला सुरुवात केली. यावेळी सुनील धोंडू भोईटे (वय ५२) यांना १५ ते २० जणांच्या जमावाने पकडून रस्त्यावर आडवा पाडला, त्यानंतर बुटाच्या लाथांनी जबर मारहाण करायला सुरुवात केली. जमावातील प्रत्येक जण मिळेल त्या पध्दतीने मारहाण करीत होते. त्यानंतर जयेश बाबुराव भोईटे (वय ३२) या तरुणाच्या डोक्यात जबर मार बसल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला. अ‍ॅड.विजय भास्कर पाटील यांनी लोखंडी रॉड डोक्यात टाकल्याची माहिती भोईटे याने पत्रकारांना दिली.सर्वत्र पळापळ अन् दहशतीचे वातावरणमुख्य रस्त्यावर झालेली दगडफेक व हाणामारी पाहून सर्वत्र पळापळ झाली. परिसरातील नागरिक, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण होते. न्यायालय व गणेश कॉलनीकडे जाणारा रस्ता २० मिनिटासाठी बंद झाला होता.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव