शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवलिंग घेण्यासाठी गेलेल्या भक्तांवर काळाचा घाला; डंपर-क्रुज़रच्या धडकेत ३ ठार, ४ जखमी

By ajay.patil | Updated: March 15, 2024 11:22 IST

जळगावच्या खोटे नगर परिसरात शोककळा,  बांभोरी बसस्टॉपवरील भीषण घटना

जळगाव : मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर जवळ बकावा येथे प्राणप्रतिष्ठाकरिता शिवलिंग घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या क्रूझर कारला वाळूच्या भरधाव डंपरने धडक दिल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीषण घटना शुक्रवारी  सकाळी ७ वाजता  घडली. जळगावातून घरापासून निघून अवघ्या ३ किमी अंतरावर असलेल्या बांभोरीजवळ हा अपघात झाला आहे.

विजय हिम्मत चौधरी (वय् ४०, साई नगर),  तुषार वासुदेव जाधव (वय् २८, रा. खोटे नगर) व भूषण सुभाष खंबायत (३५, रा.साई नगर ) यांचा मृत झालेल्यांत समावेश आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साईनगर भागात शिव मंदिर बांधण्यात आले असून, या मंदिरातील शिवलिंग घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता क्रुझर गाडीने ओंकारेश्वरला निघाले होते. मात्र घरापासून अवघ्या पाच मिनिटांचा अंतरावरच बांभोरी गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने क्रुझरला  जोरदार धडक दिली.  या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर  दिलीप साळुंखे, के. डी. पाटील, अनिल ठाकरे, बापू पाटील हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाळधी  पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने प्रयत्न सुरू केले होते. त्यानंतर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

अशी आहे कौटुंबिक पार्श्वभूमी -घटनेत मयत झालेला भूषण खंबायत याचे साईनगर येथे समृद्धी प्रोव्हिजन आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण,  पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. तर विजय चौधरी हे शेरी ता. धरणगाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत माध्यमिक शिक्षक असून त्यांच्या पश्चात आई वडील, एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. तुषार जाधव हा ड्रायव्हर असून त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे. दरम्यान मयत झालेल्या सर्वांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात एकाच आक्रोश केला होता.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू