रामचंद्र बब्रुवहन पाटील (रा. उंबरखेड, ता. चाळीसगाव) याने १ एप्रिल, २०१५ ते ३१ डिसेंबर, २०२० दरम्यानच्या कालावधीत इतर साथीदारांच्या संगनमताने शेतकरी योजना आणि कर्ज प्रकरणात अफरातफर करून, तब्बल ५१ लाख २९ हजार ६१२ रुपयांचा अपहार केला आहे. याप्रकरणी शासकीय लेखा परीक्षक मंगेश वळवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात सचिव रामचंद्र पाटील याच्यासह संस्थेचे चेअरमन, संचालक, बँकेचे संबंधित अधिकारी अशा १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात रामचंद्र पाटील याला १३ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली असून, तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत कारागृहात आहे. पाटील याने जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर मंगळवारी न्या. डी. वाय. काळे यांच्या न्यायालयात कामकाज झाले. सरकार पक्षातर्फे ॲड. पंढरीनाथ चौधरी यांनी कामकाज पाहिले.
५१ लाखांच्या अपहार प्रकरणात विकासो सचिवाचा जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:19 IST