शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
5
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
6
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
7
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
8
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
9
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
10
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
11
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
12
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
13
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
14
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
15
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
16
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
17
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
18
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
19
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
20
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   

रक्षाबंधनापूर्वीच नियतीने बांधली मृत्यूशी गाठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 11:51 IST

धक्कादायक : बहिणीला घ्यायला जाण्यापूर्वीच भावाचा तलावात बुडून मृत्यू

जळगाव : दरवर्षी अगदी न चुकता हसत खेळत, मजा मस्तीत साजरा होणारा रक्षाबंधनाचा सण. अगदी यावर्षी कोरोना, लॉकडाऊन असतानाही असाच हा सण साजरा होणार होता. त्याचा उत्साहही दोन भाऊ अन् त्यांच्या बहिणीमध्ये होता. ड्युटी आटोपून भाऊ आपल्या बहिणीला सासरहून आणण्यासाठी निघणार होता. मात्र ड्युटीवरच त्याच्या आयुष्याची अखेर झाली. तिला घ्यायला जाण्यापूर्वीच ड्युटीवर असताना तलावात बुडून भावाचा मृत्यू झाला.ही घटना रविवारी सकाळी १०.३० वाजता शिरसोली रस्त्यावरील जैन व्हॅलीच्या समोर असलेल्या अनुभूती शाळेच्या आवारातील डिव्हाईन पार्कमध्ये घडली.शंकर तुकाराम सपकाळे (३२, रा.मोहाडी, ता.जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच भावाने जगाचा निरोप घेतल्याने बहिणीसह कुटुंबाने प्रचंड आक्रोश केला.

सायंकाळी जाणार होताबहिणीला घेण्यासाठीयाबाबत माहिती अशी की, मोहाडी येथील शंकर सपकाळे हा जैन व्हॅली कंपनीत वॉटर मेन्टेनन्स विभागात कामाला होता. सोमवारी रक्षाबंधन असल्याने मोठा भाऊ किशोर याने त्याला रविवारी सकाळीच बहिणीला घ्यायला जायला सांगितले. मात्र ड्युटीवर जाणे आवश्यकच असल्याने तेथून आल्यावर जाईन, असे सांगून तो सकाळीच ड्युटीला गेला. डिव्हाईन पार्कमध्ये तलावात साफसफाईचे काम करीत असताना सकाळी १०.३० वाजता आतमध्ये असलेल्या वायरमध्ये पाय अडकल्याने त्याचा मृत्यू झाला.वायरमध्ये अडकला पायशंकर याला पोहता येत होते, मात्र वायरींगमध्ये पाय अडकल्याने त्याला निघणे अवघड झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर इतर सहकाऱ्यांनी त्याला बाहेर काढून तातडीने कंपनीच्या रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात आणले, मात्र वैद्यकिय अधिकारी डॉ.नितीन जाधव यांनी त्याला मृत घोषित केले.शंकरच्या पश्चात आई- वडील, पत्नी निता, मुलगा देवांश, दोन भाऊ असा परीवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी महेंद्र गायकवाड व हेमंत पाटील यांनी पंचनामा व शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यावेळी उपस्थित लोकांच्या अश्रूंचा बांध फुटला होता.शंकर हा नेहमी दुसऱ्यांदा मदत करीत होता. त्याच्या जाण्याने एक चांगला तरुण गमावल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक केली.बहिणीने बांधली अखेरची राखीशवविच्छेदन झाल्यानंतर शंकर याचा मृतदेह मोहाडी येथे नेण्यात आला. अंत्ययात्रा काढण्यापूर्वी बहीण चंद्रभागा हिने शंकर याच्या हाताला राखी बांधली. ही राखी बांधतांना बहिणीचा आक्रोश व तेथील परिस्थिती पाहता उपस्थितीतांचाही अश्रूचा बांध फुटला. त्यानंतर स्मशानभूमीत शंकरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण गाव एकत्र आले होते.आक्रोश करताना भाऊ बेशुध्दया घटनेची माहिती मिळाल्यानंतर शंकरचे भाऊ किशोर, ईश्वर, वडील तुकाराम सपकाळे व गावकºयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. शंकरचा मृतदेह पाहताच त्यांनी एकच आक्रोश केला. यावेळी ईश्वर हा बेशुध्द झाला होता. गावातील धनंजय उर्फ डंप्पी भिलाभाऊ सोनवणे व इतर लोकांनी या कुटुंबाला सावरुन तातडीने शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली. शंकरचे दोघं भाऊ जैन कंपनीत नोकरीला आहे. किशोर हा टिश्युकल्चर तर ईश्वर हा सोलर विभागात आहे. आई अंजनाबाई व वडील तुकाराम सपकाळे शेती करतात. बहीण चंद्रभागा विवाहित असून जळगाव शहरातील दिनकर नगरात दिलेली आहे. तीन भावांचे कुटुंब मनमिळावू व प्रेमळ होते. रक्षाबंधनाच्या आधीच शंकरच्या या घटनेने कुटुंबासह गावाला धक्का बसला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव