कवितेला नियतीने अमरत्व बहाल केले : प्रा.वा.ना.आंधळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 04:54 PM2020-01-01T16:54:14+5:302020-01-01T16:55:47+5:30

कवितारुपी आईला वयाचंही बंधन नाही. त्यामुळेच सातशे वर्षांपासून माऊलीचे पसायदान आजही म्हटले जाते. कवितेला नियतीने अमरत्व बहाल केले आहे, असे भावनिक प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी प्रा.वा.ना.आंधळे यांनी सांगितले.

 Destiny granted immortality to poetry: Prof. blind | कवितेला नियतीने अमरत्व बहाल केले : प्रा.वा.ना.आंधळे

कवितेला नियतीने अमरत्व बहाल केले : प्रा.वा.ना.आंधळे

Next
ठळक मुद्देअमळनेरला मराठा समाज महिला मंडळातर्फे कार्यक्रमदेवगाव देवळी हायस्कूलचे शिक्षक ईश्वर महाजन यांचा सत्कार

अमळनेर, जि.जळगाव : मराठी वाङ्मयात आई इतकं वात्सल्य आणि ममत्व तर कुणी जपलं असेल तर ते कविताच्या वाङ्मय प्रकाराने. कारण संस्कार, संस्कृती आणि कविता याचं जवळचं नातं असून, मुळात हा साहित्य प्रकार शाश्वत व भेदाच्या पलीकडचा आहे. तुमची आई माझी आई होऊ शकत नाही, माझी आई तुमची आई होऊ शकत नाही. तुमच्या माझ्या आईला वयाच्या मर्यादा आहेत. पण कवितारुपी आईला वयाचंही बंधन नाही. त्यामुळेच सातशे वर्षांपासून माऊलीचे पसायदान आजही म्हटले जाते. कवितेला नियतीने अमरत्व बहाल केले आहे, असे भावनिक प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी प्रा.वा.ना.आंधळे यांनी सांगितले.
मराठा सभागृहामध्ये मराठा महिला मंडळाचे आयोजित केलेल्या प्रबोधन समारंभात खान्देश कवी प्रा.आंधळे प्रमुख अतिथी होते. यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा तिलोत्तमा पाटील उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी श्रावण पाटील होते.
देवगाव देवळी हायस्कूलचे शिक्षक ईश्वर महाजन यांना वर्ल्ड पार्लमेंट आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन भारती पाटील तर आभार प्रदर्शन रेखा मराठे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.शीला पाटील, माधुरी पाटील, पद्मजा पाटील, विजया देसर्डा, लीना पाटील, रागिनी महाले, प्रभा पवार, भारती पाटील, भारती गाला, मनीषा पाटील, सुलोचना वाघ यांनी प्रयत्न केले.

Web Title:  Destiny granted immortality to poetry: Prof. blind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.