शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जामठी येथे व्यायामशाळा असूनही ठरतेय निरर्थक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 15:00 IST

जामठी या गावात व्यायामशाळा असूनही ती साहित्याअभावी निरर्थक ठरत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देबांधकाम झाले, पण साहित्यच नाहीतरुण करताय रस्त्यावर सराव

विकास पाटीलजामठी, ता.बोदवड, जि.जळगाव : बोदवड शहराच्या उत्तरेला नऊ किलोमीटर अंतरावरील जामठी या गावात व्यायामशाळा असूनही ती साहित्याअभावी  निरर्थक ठरत असल्याचे चित्र आहे.अडीच हजार लोकसंख्येचे जामठी हे बाजारपेठेचे गाव आहे. परिणामी येथे वर्दळ असते. अशा या गावात २००१-२००२ मध्ये सुमारे दोन लाख ९४ हजार ३६२ रुपये निधीतून ‘महाराणा प्रतापसिंह व्यायामशाळेचे’ बांधकाम करण्यात आले. तत्कालिन खासदार वाय.जी. महाजन यांच्या निधीतून हे बांधकाम ते पूर्णत्वास आले.बांधकाम झाल्यानंतर ही व्यायामशाळा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत करण्यात आली. व्यायामशाळेचे बांधकाम तर झाले, पण तरुणांना व्यायाम करण्यासाठी या व्यायामशाळेत व्यायामाचे कोणतेही साहित्य उपलब्ध करून देण्यात आले नाही. परिणामी गेल्या १८ वर्षांपासून ही व्यायामशाळा बांधकाम पूर्ण होऊनही निरुपयोगी ठरत आहे.व्यायामाच्या साहित्याअभावी तरुणांना मोकळ्या रस्त्यावर व्यायाम करावा लागत आहे. बांधकाम झालेल्या या व्यायामशाळेत आजच्या स्थितीत काही वेळा जुगार चालतो, तर केव्हा गांजा फुंकणारे दिसतात, अशी तरुणांची व्यथा आहे.दरम्यान, व्यायामशाळेकडे ग्रामपंचायत किंवा कोणीही पुढारी फिरकून पाहत नाही, अशी तरुणांची व्यथा आहे. गावात व्यायामशाळा असल्यावरही गावातील तरुण मुले साहित्याअभावी रस्त्यावर कसरत करताना दिसत आहेत. व्यायामशाळेत सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या पाहिजे. जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांनी या व्यायामशाळेची पहाणी करून क्रीडा विभागाकडून अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी माागणी जामठीतील तरुणांनी केली आहे.सर्व गावातील तरुण मंडळी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे आपल्या समस्या मांडणार आहेत.-महेंद्रसिंग बिरसिंग पाटील, तरुण, जामठी

टॅग्स :YogaयोगBodwadबोदवड