शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भडगावच्या आधीच चाळीसगावला डेप्युटी आरटीओ कार्यालय मंजूर

By सुनील पाटील | Updated: February 27, 2024 17:02 IST

जळगावचे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्याकडेच या कार्यालयाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.

जळगाव : जळगावला प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय (आरटीओ) निर्माण झाल्यानंतर आता चाळीसगावला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (डेप्युटी आरटीओ) कार्यालय मंजूर झाले असून त्याची अधिसूचना राज्य शासनाने काढली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कार्यालय कार्यान्वित होणार असून जळगावचे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्याकडेच या कार्यालयाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. भडगावचा प्रस्ताव आधी असतानाच चाळीसगावला कार्यालय मंजूर झालेले आहे.

सध्या या कार्यालयासाठी भाडे तत्वावर जागा घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. नवीन पदांची निर्मिती होईपर्यंत समायोजनाने पदे भरण्याच्या सूचना आहे.  एक डेप्युटी आरटीओ, एक एआरटीओ, चार मोटार वाहन निरीक्षक, सहा दुय्यम मोटार वाहन निरीक्षक, पाच लिपिक व शिपाई आदी पदे शेजारच्या कार्यालयातून घेतले जाणार आहेत. जळगावला एआरटीओची सहा पदे मंजूर असून ती रिक्त आहेत. त्यामुळे नाशिक, मालेगाव व धुळे या कार्यालयातून पदे समायोजित केली जाण्याची शक्यता आहे.

एम.एच.५२ नवा नोंदणी क्रमांक

चाळीसगावसाठी एम.एच.५२ हा नवीन नोंदणी क्रमांक देण्यात आला आहे. त्याशिवाय एक इंटरसेप्टर वाहनालाही मंजुरी देण्यात आली आहे. कार्यालयासाठी लागणार खर्च व इतर खर्चाची अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद केली जाणार आहे. गृहविभागाचे अवर सचिव भरत लांघी यांनी याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. 

टॅग्स :ChalisgaonचाळीसगावJalgaonजळगाव