शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दलाचे खच्चीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 12:24 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांना चाप लावला. त्यानंतर धंद्याशी संंबंधित अधिका-यांची उचलबांगडी करुन अकार्यकारी पदावर नियुक्ती केली तर खास जबाबदारी असलेल्या ८० पोलिसांना एक महिन्याचा नवचैतन्य कोर्स सक्तीचा केला. या कारवायांमधून जिल्हा पोलीस अधीक्षकांची प्रतिमा सामान्य जनतेत उंचावली. इतकेच काय ८० टक्के कर्मचारी देखील एस.पींच्या निर्णयाने खूश होते. तीन महिन्यात उंचावलेली प्रतिमा थर्टी फर्स्टच्या एका रात्रीतून मलीन झाली.

ठळक मुद्देविश्लेषणतर ख-या अर्थाने पोलीस अधीक्षक व सहायक पोलीस अधीक्षक सिंघम झाले असते प्रतिबंधक कारवायांवर प्रकरण मिटविण्यात आले

सुनील पाटीलजळगाव : जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांना चाप लावला. त्यानंतर धंद्याशी संंबंधित अधिका-यांची उचलबांगडी करुन अकार्यकारी पदावर नियुक्ती केली तर खास जबाबदारी असलेल्या ८० पोलिसांना एक महिन्याचा नवचैतन्य कोर्स सक्तीचा केला. या कारवायांमधून जिल्हा पोलीस अधीक्षकांची प्रतिमा सामान्य जनतेत उंचावली. इतकेच काय ८० टक्के कर्मचारी देखील एस.पींच्या निर्णयाने खूश होते. तीन महिन्यात उंचावलेली प्रतिमा थर्टी फर्स्टच्या एका रात्रीतून मलीन झाली.माजी महापौर ललीत कोल्हे यांच्या ममुराबाद शिवारातील कोल्हे फार्महाऊस झालेली ‘डर्टी पार्टी’ सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी उधळून लावत. छय्या छय्या करणा-या सहा नर्तीकांसह १८पुरुषांना ताब्यात घेतले. या कारवाईत राजकीय दबाव प्रचंड वाढल्याने काही जणांना जागेवरच सोडून देण्यात आले तर दुस-या दिवशी गुन्हा दाखल न करता केवळ प्रतिबंधक कारवायांवर प्रकरण मिटविण्यात आले. अधिका-यांची इच्छा नसताना त्यांना राजकीय दबावाला सामोरे जावे लागले. ही वस्तू स्थिती असली तरी पोलिसांनी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता कारवाई करुन मोकळे व्हायला हवे होते. परंतु तसे झाले नाही आणि तेथेच ‘खाकी’ च्या प्रतिमेला धक्का बसला. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पोलीस दलाविषयी नाराजी उमटू लागली. दुसरीकडे काम करणा-या अधिका-यांचेही खच्चीकरण झाले. अवैध धंद्याचे समर्थन कुणी करणारच नाही, मात्र किरकोळ गावठी दारु विक्रेते, हातगाडीवर मद्य प्राशन करणा-यांना कोठडीत टाकतात.  दारु विक्रेत्यांच्या घरांची झडती घेतली जाते, मग येथे तर दारुचा मोठा साठाच होता, कारवाईत त्याचा साधा उल्लेखही नाही. इतकेच काय पार्टीच स्थळही बदलण्यात आले. ‘गरीब की बीवी सबकी भाभी’ .... या म्हणीचा प्रत्यय या कारवाईतून आला आहे. सामान्यांवर तर कोणीही कारवाई करते, त्याची फारशी चर्चाही होत नाही. बड्या धेंड्यावर कारवाईचीच चर्चा होते. कोल्हे यांच्या फार्महाऊसवरील डर्टी पार्टी शी संबंधित लोकांवर पोलिसांनी प्रामाणिकपणे कारवाई केली असती तर ख-या अर्थाने पोलीस अधीक्षक व सहायक पोलीस अधीक्षक सिंघम झाले असते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव