शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
4
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
5
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
6
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
7
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
8
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
9
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
10
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
11
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
12
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
13
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
14
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
15
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
16
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
17
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
18
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
19
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
20
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड

विठ्ठलनामाच्या जयघोषात अमळनेरच्या दिंडीचे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 6:01 PM

पाऊले चालती पंढरीची वाट : २१ जुलै रोजी दिंडी पंढरपुरात पोहोचणार

ठळक मुद्देदिंडीला निरोप देण्यासाठी जमलेल्या भाविकांमुळे तुळशीबागेचा परिसर फुलून गेला होता. प्रत्येकाच्या मुखी विठ्ठल-रुख्मिणी, संत सखाराम महाराजांचा जप सुरू होता.पांढरे कपडे, कपाळी गंध, गळ्यात तुळशीची माळ व खांद्यावर भगवा ध्वज, व मुखी विठ्ठलाचा जप करीत वारकरी दिंडीसाठी सज्ज झालेले होते. याचवेळी ढोलताशाच्या तालावर अनेक वारकºयांंनी ठेका धरला. महिलांनी फुगड्या खेळल्या. त्यामुळे उत्साहात भर पडली होती. सर्वत्र वातावरण भक्तिमय झाले होते.

अमळनेर, जि.जळगाव : संत सखाराम महाराजांचा जयजयकार, विठ्ठल नामाचा जयघोष करीत संत सखाराम महाराज विठ्ठल-रुख्मिणी संस्थानच्या दिंडीचे शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता तुळशी बागेतून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी भाविकांचा उत्साह अमाप होता.वारीत सहभागी होण्यासाठी भाविकांची सकाळपासूनच वाडी संस्थानमध्ये गर्दी होऊ लागली होती. पहाटेपासूनच वाडीत टाळमृदुंगाचा आवाज निनादू लागला होता. सकाळी प्रसाद महाराजांचे वाडीत विठ्ठलासमोर कीर्तन झाले. त्यानंतर समाधीचे दर्शन घेतल्यानंतर प्रसाद महाराज पैलाडमधील तुळशी बागेत आले. या ठिकाणी महाराजांच्या हस्ते तुळशीपत्र अर्पण करण्यात आले.पूजा आटोपल्यानंतर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या. भाविकांसाठी येथे शामियाना टाकण्यात आला होता. ओसरीवर बसून महाराज भाविकांना खडीसाखरेचा प्रसाद व आशीर्वाद देत होते. दिंडी निघण्याची वेळ समीप येत होती. तसतशी भाविकांची गर्दी वाढू लागली होती.दुपारी ठीक १२.३० वाजता आरती झाली. प्रसाद महाराजांनी भाविकांना आशीर्वाद देताच भाविकांनी संत सखाराम महाराज की जय असा जयघोष केला. महाराजांनी डोक्यावर पांढरी घोंगडी घेतली अन् महाराज व वारकरी पंढरपूरकडे रवाना झाले. दिंडीत शेकडो भाविक सहभागी झाले होते.२३ दिवसांचा प्रवास केल्यानंतर अमळनेरची पायी दिंडी शनिवार, २१ जुलै रोजी पंढरपूरला पोहचेल.दिंडीचा पहिला मुक्काम पारोळ्याला आहे. तेथून आडगाव, भडगाव, नगरदेवळा, नेरी, नागद, बिलखेडा, नागापूर, पिशोर, चिखलठाण, टाकळी, दौलताबाद, वाळूंज, महारूळ, पैठण, शेवगांव, पाथर्डी, धामणगांव, कडा, आष्टी, अरणगांव, जवळा, करमाळा, निंभोरा, वडशिवणे, सापटणे, करकंबमार्गे २१ जुलैला पंढरपुरात दाखल होईल.या वेळी महेश कोठावदे, राजू महाले, विजय प्रभाकर पाटील, पवार, बी.आर.बोरसे, पी.एस.कुलकर्णी, संदीप मल्हारी पाटील, मोतीलाल अहिरे, पवन शेटे, गोपी कासार, सुरेश पिरन पाटील, उमेश देशमुख, राजकुमार बित्राई, विठोबा महाजन, अजबराव पाटील, रघू कंखरे, बापू झुलाल, अ‍ॅड.लाठी, नितीन निळे, कमल दलाल, विजय शुक्ल, प्रांत संजय गायकवाड, दिनेश सोनवणे, उदय देशपांडे, संजय एकतारे आदी उपस्थित होते.