शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जि.प.च्या अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी विभागनिहाय नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 12:25 IST

प्रक्रिया पूर्णत्वास

ठळक मुद्दे२५ कोटींची तरतूद विशेष सभेत अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात येणार

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २२ - जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पाची प्रक्रिया पूर्णत्वास आली असून यात २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. येत्या विशेष सभेत या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात येणार असून त्यानिमित्त प्रशासनातर्फे विभागनिहाय निधीचे नियोजन करण्यात आले आहे. यात शिक्षण, पाणी पुरवठा आणि कृषी विभागात एकूण ६० लाख रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.जि.पच्या उपकर अनुदान, वाहनकर, उपकर सापेक्ष अनुदान, पाणीपट्टी, जिल्हा निधीतून मिळणारे व्याज यातून मिळणाऱ्या स्वत:च्या उत्पन्नातून जि.प. अर्थसंकल्पाचे नियोजन केले जाते. या अर्थसंकल्पात विषयानुसार निधीची तरतुदी करण्यात आल्या आहेत. प्रत्येक विभागाकडून आलेल्या कामांची आवश्यकता जाणून घेत प्रत्येक विभागाला असलेल्या निधीनुसार कामांचे नियोजन करण्यात आले.शिक्षण विभागात दोन लाख रुपये वाढीव तरतुदीसह एकूण ६१ लाख ५० हजार रुपयांच्या निधीचे नियोजन करण्यात आले. यामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार एक लाख, जिल्हा परिषद अध्यक्ष चषक १ लाख ५० हजार, तालुकानिहाय शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाºया विद्यार्थ्यांसाठी दोन लाख, शाळा डिजिटल २० लाख, विज्ञान प्रदर्शन १ लाख, न्यायप्रविष्ठ खटल्यांसाठी वकिल फि ८ लाख, प्राथमिक विभागात शिष्यवृत्ती परिक्षा फी व मार्गदर्शक पुस्तीका २० लाख, स्काऊट गाईड ३ लाख, वेतनेतर १ लाख, जि.प. विद्यानिकेतन सादील खर्च ४ लाख यानुसार तरतूद करण्यात आली आहे. तर सार्वजनिक मालमत्ता परिक्षण ३५ लाख ९० हजार, आरोग्यासाठी ३८ लाख ५० हजार, पाणी पुरवठा आणि स्वच्छतेसाठी १० लाखाच्या वाढीव निधीसह ४ कोटी रुपये, समाजकल्याणसाठी २ कोटी, महिला आणि बालविकास १ कोटी १० लाख, पशुसंवर्धन ८० लाख, पाटबंधारे २ कोटी ६९ लाख, कृषीसाठी ३० लाखाच्या वाढीव तरतुदीसह एकूण १ कोटी ४० लाख, पशुसंवर्धन १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावzpजिल्हा परिषद