शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

जळगावात उपचारास नकार; हॉस्पीटलमध्ये तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 12:17 IST

‘सिव्हील’मधून हलविले खासगी दवाखान्यात

ठळक मुद्दे७० हजाराचे पॅकेज, प्रत्यक्षात खर्च २ लाखसहकारी डॉक्टरांनी मध्यस्थी केल्याने पुढील उपचार करण्याची तयारी

जळगाव : उपचाराचे पॅकेज ठरल्यानंतरही अपघातात जखमी रुग्णावर प्लास्टीक सर्जरी करण्यास नकार दिल्याने आर.एच.अग्रवाल अ‍ॅक्सीडेंट हॉस्पीटलमध्ये शनिवारी रात्री १० वाजता तणाव निर्माण झाला होता. डॉ.राजेंद्र अग्रवाल यांच्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करीत हॉस्पिटलची तोडफोड करण्याचा दम भरला. दरम्यान, पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.पांडुरंग भिका कोळी (वय ५३, रा.भालशिव, ता.यावल) यांचा महिनाभरापूर्वी दुचाकी घसरल्याने अपघात झाला होता. त्यात त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. परिस्थिती अत्यंत गरीबीची असल्याने कोळी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवस तेथे उपचार केल्यानंतर डॉ.राजेंद्र अग्रवाल यांनी तपासणी करुन शस्त्रक्रिया व प्लास्टीक सर्जरी करण्याचा सल्ला देत या रुग्णाला स्वत:च्या आर.एच. अग्रवाल अ‍ॅक्सीडेंट या खासगी रुग्णालयात हलविले.७० हजाराचे पॅकेज, प्रत्यक्षात खर्च २ लाखरुग्णाचे नातेवाईक व डॉक्टर यांच्यात ७० हजार रुपयात शस्त्रक्रिया व प्लास्टीक सर्जरी करण्याचे ठरले होते. त्यानुसार डॉ.अग्रवाल यांनी शस्त्रक्रिया केली. शनिवारपर्यंत दोन लाख रुपये खर्च आला. आता प्लास्टीक सर्जरीसाठी डॉ.अग्रवाल यांनी पुन्हा ५० हजाराची मागणी केली. त्यावरुन वादाला तोंड फुटले. डॉक्टरांनी उपचारास नकार देत रुग्णास जनरल वॉर्डात आणून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची इशारा दिला. त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले. तणाव निर्माण झाल्याने जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सहकाऱ्यांसह धाव घेत वादावर नियंत्रण मिळविले. यावेळी डॉ.प्रताप जाधव व अन्य सहकारी डॉक्टरांनी मध्यस्थी केल्याने पुढील उपचार करण्याची तयारी डॉ.अग्रवाल यांनी दाखविली.प्लास्टीक सर्जरी न करता आज रुग्णाला जिल्हा रुग्णालयात हलविण्याची तयारी डॉक्टरांनी केली होती. उपचारासाठी ६० हजारात घेतलेली बैलजोडी ३० हजारात विक्री केली. डॉक्टरांकडून आमची फसवणूक झाली.-सुनील सपकाळे, रुग्णाचे नातेवाईकशस्त्रकियेचेच पॅकेज ठरलेले होते. त्यात प्लास्टीक सर्जरीचा समावेश नव्हता. रुग्णाचे नातेवाईक खोटे बोलत आहेत. जिल्हा रुग्णालयात रुग्णास पाठविण्याचेही मी बोललो नाही.-डॉ.राजेंद्र अग्रवाल

टॅग्स :doctorडॉक्टरJalgaonजळगाव