शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू’ने घेतला तरुणाचा जीव!‘ डेंग्यू’चा डंख, ९ महिन्यात १५० रुग्ण; ८ पाझिटिव्ह

By सुनील पाटील | Updated: September 14, 2023 16:00 IST

जळगाव : ‘ डेंग्यू’ या साथीच्या आजाराने देवेंद्र विकास बारी (वय १९,रा.शिरसोली प्र.बो.ता. जळगाव ) या तरुणाचा गुरुवारी पहाटे ...

जळगाव: ‘डेंग्यू’ या साथीच्या आजाराने देवेंद्र विकास बारी (वय १९,रा.शिरसोली प्र.बो.ता.जळगाव) या तरुणाचा गुरुवारी पहाटे तीन वाजता शहरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. चालू वर्षातील ‘डेंग्यू’चा हा पहिला बळी आहे. जानेवारी ते १४ सप्टेबर या कालावधीत शहरात डेंग्यूचे १५० रुग्ण संशयित तर ८ रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत. शिरसोलीत आणखी एक तरुण डेंग्यू सदृश्य आढळून आलेला आहे.

पावसाळा येताच विविध साथीच्या रोगांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होते. त्यात प्रामुख्याने डेंग्यूच्या साथीचादेखील समावेश असतो. शहरात दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असतात. यंदाही तेच चित्र पाहायला मिळत आहे. हिवताप विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार गेल्या महिन्यात ७४ तर या महिन्यात १४ दिवसात ५५ संशयितांचे अहवाल तपासणीसाठी धुळ्याला पाठविण्यात आलेले आहेत. शिरसोली येथील देवेंद्र बारी या तरुणाला गेल्या आठवड्यात ताप आला होता. शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. रविवारी त्याचा ‘डेंग्यू’चा अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचार सुरु असताच गुरुवारी पहाटे तीन वाजता त्याचा मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये देखील दररोज डेंग्यू सदृश्य आजाराचे २० ते २५ रुग्ण दाखल होत आहेत.

हिवताप विभागाकडून सर्वेक्षणहिवताप विभागाचे आरोग्य सहायक के.बी.नगराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागामार्फत ८ आरोग्य सेवक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतात. पाण्याच्या टाक्या, भांडे, टायर याची तपासणी करुन ते स्वच्छ केले जाते. खासगी दवाखान्यात रुग्ण आढळला तर त्याचे रक्ताचे नमुने घेऊन धुळे येथील हिरे वैद्यकिय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविले जातात. जेथे रुग्ण आढळला त्याची माहिती मनपाला कळविली जाते. त्यानंतर मनपातर्फे त्या भागात फॉगिंग (फवारणी) केले जाते. 

टॅग्स :dengueडेंग्यूJalgaonजळगाव