बोदवड, जि. जळगाव : डेंग्यूने जिल्ह्यात पुन्हा एकदा डोके वर काढले असून जिल्ह्यातील बोदवड येथील नगरसेविका सुशिलाबाई गंगतिरे यांची चार वर्षीय नात श्रावणी दिलीप गंगतिरे या बालिकेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. विशेष म्हणजे १ जानेवारी रोजीच या बालिकेचा वाढदिवस झाला होता. त्यानंतर चौथ्याच दिवशी या बालिकेवर काळाने झडप घातली.या बालिकेवर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते.
डेंग्यूचा डंख.... वाढदिवसाच्या चौथ्याच दिवशी बालिकेवर काळाची झडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 12:29 IST