जळगावात घरकामगार महिलांचे सहाय्यक कामागार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 04:33 PM2017-12-18T16:33:36+5:302017-12-18T16:37:12+5:30
घरकामगारांचे निवृत्तीचे वय ६० ऐवजी ७० करा, घरकामगारांना दरमहा ३ हजार निवृत्ती वेतन द्या, कल्याणकारी मंडळाच्या सर्व योजनांचे लाभ द्या यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी घरकाम कामगार युनियनच्या नेतृत्वात सोमवारी सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१८ - घरकामगारांचे निवृत्तीचे वय ६० ऐवजी ७० करा, घरकामगारांना दरमहा ३ हजार निवृत्ती वेतन द्या, कल्याणकारी मंडळाच्या सर्व योजनांचे लाभ द्या यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी घरकाम कामगार युनियनच्या नेतृत्वात सोमवारी सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़
विविध मागण्यांसाठी वारंवार निवेदन, आंदोलन करण्यात येवूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने सोमवारी घरकाम युनियनच्या नेतृत्वाखाली आंबेडकर मार्केट परिसरातील कामगार विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनात कॉ़ कलावती पाटील, कॉ.विजय पवार, कॉ़लताबाई महाजन, कॉ़सुशीलाबाई पाटील, अरुणा हरणे, आरती गायकवाड, कॉ.विजया जाधव, कॉ़अरुण हरणे, कॉ़आरती गायकवाड, कमल पाटील यांच्यासह घरकामगार महिला सहभागी झाल्या होत्या़ यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजीही केली़ सीआयटीयुअंतर्गत विविध संघटनांही आंदोलनाला पाठिंबा दिला़
अशा आहेत मागण्या
घरेलु कामगार कल्याणकारी मंडळास दरवर्षी शासनाकडून निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, राज्य घरकाम कल्याणकारी मंडळाचे पुनर्गठन करा, जिल्हापातळीवर त्रिपक्षीय घरकाम मंडळाचे गठन करा, घरेलू कामगारांच्या पाल्यांना प्राथमिक प्राथमिक, पदवी तसेच व्यावसायिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची तजवीज करा, घरकुल अनुदान ई कल्याणकारी योजनांचे लाभ लागू करा, सर्व कामगार कायदे लागू करुन त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले़ मागण्यांवर त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही घरकाम कामगार युनियनतर्फे निवेदनाव्दारे देण्यात आला आहे़