जळगाव: शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहातील अडचणी दूर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी गुरूवार, ११ आॅक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास प्रारंभ केला. खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. तसेच सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.यापूर्वी शासकीय आदिवासी वसतिगृहांमधील अडचणींबाबत २१ सप्टेंबर २०१८ रोजी तर २८ सप्टेंबर रोजी प्रकल्प अधिकारी यांना निवेदन दिले होते. प्रकल्प अधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी वरिष्ठ अधिकाºयांश्ी चर्चा करून तत्काळ प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र प्रकल्प अधिकाºयांकडून मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रकल्प अधिकारी यांनी तेव्हा केलेल्या आवाहनामुळेच आमरण उपोषण मागे घेण्यात आले होते. मात्र मागण्यांचा विचार झालेला नाही. त्यामुळे गुरूवार, ११ आॅक्टोबरपासून आमरण उपोषण करीत असल्याचा इशारा दिला.सुप्रिया सुळेंनी घेतली आंदोलकांची भेटखासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. दिवसभर बसूनही कोणीही अधिकारी फिरकला नसल्याचे समजल्याने त्यांनी जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधला. त्यानंतर प्रकल्प अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्या शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. मात्र विद्यार्थ्यांचे समाधान न झाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. रात्रीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर उघड्यावर बसून राहणार असल्याचे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी जाहीर केले. मात्र सायंकाळी जिल्हाधिकाºयांनी या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.-----या आहेत मागण्या१) शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह, जळगाव येथे वाढीव जागा उपलब्ध करून द्याव्या.२) ज्या मुला-मुलींनी या शैक्षणिक वर्षात सन २०१८-१९ मध्ये ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहाची त्वरित व्यवस्था करण्यात यावी.३)ज्या विद्यार्थ्यांनी खास बाब म्हणून अर्ज सादर केलेला आहे, त्यांची तत्काळ यादी जाहीर करावी.
जळगावातील शासकीय आदिवासी वसतिगृहाच्या अडचणी दूर करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:16 IST
आश्वासनानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आमरण उपोषण मागे
जळगावातील शासकीय आदिवासी वसतिगृहाच्या अडचणी दूर करण्याची मागणी
ठळक मुद्दे आश्वासनांची पूर्तता न झाल्याने आंदोलनखासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आंदोलकांची भेट