शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीतील पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांकडे बील मंजूर करण्यासाठी केली पैशाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 15:23 IST

रावेर पंचायत समिती आढाव बैठकीत एकात्मिक बालविकास पर्यवेक्षिकेविरूध्द केली तक्रार

रावेर, जि.जळगाव : एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत काही पर्यवेक्षिका अंगणवाडींमध्ये पोषण आहार शिजवणाºया बचत गटाच्या महिलांना बील मंजूर करण्यासाठी चिरीमिरी मागत असल्याची तक्रार पं.स.सदस्य जितू पाटील व दीपक पाटील यांनी थेट पंचायत समितीच्या आढावा बैठकीत मांडल्याने एकच खळबळ उडालीे. दरम्यान, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी ए.बी.तडवी हे अनुपस्थित राहिल्याने यासंबंधीची कारवाई गुलदस्त्यात राहिली. आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती माधुरी नेमाडे होत्या.रावेर पंचायत समितीच्या आढावा बैठकीत पुनर्वसन, कृषी, सार्वजनिक बांधकाम, जि.प. बांधकाम व सिंचन, महावितरण, आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन विभागाचा आढावा सदस्यांनी घेतला. मागील पं.स.आढावा बैठकीत चर्चिल्या गेलेल्या रसलपूर येथील अंगणवाडीतील महिला बचत गटाच्या महिलांकडून पोषण आहार शिजवण्यासंबंधीचे बील मंजूर करण्यासाठी चिरीमिरीच्या स्वरूपात पैशांसाठी अडवणूक केली जात असल्याचे तक्रारीसंबंधी काय चौकशी करण्यात आली? चौकशीतून काय निष्पन्न झाले व संबंधित दोषींवर काही कारवाई करण्यात आली काय, असा प्रश्नांचा भडीमार जितू पाटील व दीपक पाटील यांनी केला. मात्र संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी ए.बी. तडवी अनुपस्थित राहिल्याने सदरचे प्रश्न अनुत्तरित राहिले.पं.स.आढावा बैठकीत हा विषय गाजत असला तरी या विषयाला असंख्य कंगोरे फुटले असून पर्यवेक्षिका बील मंजूरीसाठी चिरीमिरीची मागणी करत असतील तर तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार शिजवणाºया महिला बचत गटाकडून अवास्तव बिले सादर करून शासन अनुदानाचा सर्रासपणे तर अपव्यय केला जात नाही ना? अंगणवाडीतील पटावरील बालके व उपस्थित बालकांमधील तफावत गिळंकृत तर केली जात नाही ना? त्यात पारदर्शकता असेल तर पर्यवेक्षिकेची चिरीमिरी मागण्याची हिंमतच कशी बळावू शकते? एकात्मिक बालविकास प्रकल्पात पोषण आहार गिळंकृत करणारी साखळी तर कार्यान्वित नाही ना? आजच्या आढावा बैठकीत महत्त्वाचे प्रकरण पटलावर असताना बालविकास प्रकल्प अधिकारी तडवी यांची अनुपस्थिती मुद्दाम तर नव्हती ना, अशा शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत.रसलपूर गाव हे प्रातिनिधिक असले तरी संबंध तालुक्यात विशेषत: आदिवासी वस्त्यांमध्ये या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त स्तरावरून सखोल चौकशी करून तत्संबंधीचे काही घबाड असल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा