लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने जिल्हापेठच्या पोलीस निरीक्षकांना पत्र दिले आहे. महानगराध्यक्ष मंगला पाटील यांच्या नेतृत्वात या महिलांनी हे पत्र दिले.
वादग्रस्त वक्तव्य केल्याने भारतीय दंडविधान कलम १५३ बी, ५०० व ५०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. दरेकर यांच्या वक्तव्याने महिलांच्या विनयशीलतेचा अपमान झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी प्रतिभा शिरसाठ, शालिनी सोनवणे, रत्ना बागुल, विमल मोरे, सुमन बनसोडे, सीमा गोसावी, बबिता तडवी, शकिला तडवी, मीनाक्षी चव्हाण, सुवर्णा पवार, मीनाक्षी शेजवळ उपस्थित होत्या.