जळगाव : अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी बांधवांवर अस्मानी संकट ओढावून आले आहे़ त्यामुळे शेतकरी पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी जळगाव जिल्हा युवा सेनातर्फे कुलगुरूंना निवेदन देवून करण्यात आली आहे़निवेनदनात म्हटले की, राज्यासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने हाहा:कार माजविल्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ तर शेतकरी बांधव आर्थिक संकटात सापडले आहे़ त्यामुळे शेतकरी पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी केली आहे़ कुलगुरू यांना निवेदन देताना युवासेनेचे जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, जिल्हा सरचिटणीस राहुल पोतदार, जिल्हा समन्वयक जितेंद्र बारी, विद्यापीठ संपर्क अधिकारी अंकित कासार, विश्वजित पाटील, अविनाश पाटील, हरिलाल शिंदे आदींची उपस्थिती होती़अभाविपतर्फे निवेदनशेतकरी पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची करण्याची मागणी गुरूवारी अभाविपतर्फे कुलगुरूंना करण्यात आली़कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याची दखल घ्यावी,अशी मागणी देखील कुलगुरूंकडे करण्यात आली. निवेदन देताना अभाविपच्या शिष्टमंडळातील विराज भामरे, कल्पेश पाटील, आदित्य नायर, प्रज्वल पाटील, तुषार पाटील, योगेश महाले, शुभम पाटील, वैभव महाजन, विश्वजित गायकवाड, धिरज पाटील, जयेश माळी, गौरव देवकर यांचा समावेश होता.
शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 22:02 IST