शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारीपणामूळे व्यसनाधीन होवून केली दाम्पत्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 10:07 IST

जळगाव : रावेर तालुक्यातील रोझोदा येथील भारंबे या वयोवृद्ध दाम्पत्यांचा निर्घुन खुन केल्याची घटना गुरुवारी, १० सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या ...

जळगाव : रावेर तालुक्यातील रोझोदा येथील भारंबे या वयोवृद्ध दाम्पत्यांचा निर्घुन खुन केल्याची घटना गुरुवारी, १० सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपासचक्रे फिरवित शेजारीच राहणार्‍या परेश खुशाल भारंबे (३२) या संशयित आरोपीच्या अवघ्या आठ तासातच मुसक्या आवळल्या. परेश हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी असून व्यसनामुळे कर्जबाजारी झाल्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.याबाबत पोलसांकडून मिळालेली माहिती अशी की, मतय भारंबे यांच्या घराशेजारील परेश खुशाल भारंबे हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असुन तो व्यसनाधीन झाला होता. या व्यसनामुळे परेश हा कर्जबाजारी झाला होता. दिवसभर हा त्या दाम्पत्याच्या घरासमोरच बसलेला असायचा त्यामुळे शेजारी राहणार्‍या ओंकार भारंबे व त्यांच्या पत्नीकडे असलेल्या पैशांचा अंदाज त्याला होता. त्यामुळे याठिकाणी चोरी करुन डोक्यावरील कर्ज फेडण्याचे त्याचे नियोजन होते.चोरी करण्यासाठी गेला अन् खून करुन आलाबुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास परेश हा चोरी करण्यासाठी शेजारी राहणार्‍या ओंकार भारंबे यांच्या घरात शिरला. यावेळी त्याने त्यांच्या घरातून काही रोख रक्कमेची चोरी केली. परंतु या दाम्पत्याला जाग आल्याने त्यांनी परेशला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र परेशने सोबत नेलेल्या सुरीने त्यांच्या गळ्यावर सपासप वार करुन त्यांचा निर्घुन खून केल्याचे समोर आले आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ठाण मांडूनघटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासचक्रे फिरविले. घटनेचा तपासासाठी डिवायएसपी गजानन राठोड, सपोनि राहुल वाघ, राजेंद्र पवार, पांडुरंग सपकाळे, विनोद पाटील, रिजवान पिंजारी, देवेंद्र पाटील, सुरेश अढायगे, संजीव चौधरी, मेहरबान तडवी, हेमराज भावसार, जगदिश पाटील, बाळु मराठे, विशाल खैरनार, योगेश सावळे, उपनिरीक्षक सुधाकर लहारे, राजेंद्र पाटील, विजय पाटील, शरीफोद्दीन काझी, अनिल इंगळे, राजेश मेंढे, संजय हिवरकर, रमेश चौधरी, संतोष मायकल, युनुस शेख, किशोर राठोड, नंदलाल पाटील, अरुण राजपुत, राहुल पाटील, नरेंद्र वारुळे हे सकाळपासून गावातच ठाण मांडून होते.श्‍वानाने माग दाखविल्याने मिळाली तपासाला दिशाघटनेचे गांभीर्यठेवत डॉगस्क्वॉड व फॉरेन्सीक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाले. श्‍वानाने भारंबेच्या घरातून थेट शेजारी राहणार्‍या परेशच्या घराचा मार्ग दाखविल्याने या पोलिसांना गुन्ह्याच्या तपासाला दिशा मिळाली. त्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास परेशला त्याच्या घरुन अटक केली असून त्याने व्यसनामूळे कर्जबाजारी झाल्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्या विरुद्ध सावदा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव