शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

हिवरा प्रकल्पातील पाण्याची नासाडी

By admin | Updated: March 1, 2017 00:17 IST

नागरिकांमध्ये तीव्र नाराजी : तातडीने दखल घेण्याची मागणी

पाचोरा : तालुक्यातील  खडकदेवळा येथील हिवरा मध्यम प्रकल्पाचे पाणी पाटचारीत वाहत जावून मोठय़ा प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. तीन वेळा कालव्याने पाणी सोडण्यात आले मात्र पाटचा:यात स्वच्छता नसल्याने पाणी वळण सोडून वाहत आहे. याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. याप्रकाराकडे संबंधित अधिका:यांचे दुर्लक्ष होत असल्याने हिवरा पट्टय़ात  भविष्यात पाणीटंचाईचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. हिवरा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. तसे उजव्या कालव्याचे पाणी आव्रे केटीवेअर्पयत सोडण्यात आले आहे. मात्र हे नियमबाहय़ पाणी कोणत्या आदेशाने सोडले याचा खुलासा होऊ शकला नाही. पाण्याची नासाडी लवकर थांबविण्यासाठी पाऊले ऊचलली जावीत तसेच वरिष्ठांनी दखल घेऊन पाणी चोरी करण्यास प्रवृत्त संबंधित अभियंत्याची चौकशी करून कारवाई करावी अशी आम आदमीची मागणी आहे. दरम्यान हिवरा नदीवरील केटीवेअरमध्ये पाणी कसे सोडले?  असा प्रश्न उपस्थित होत असून परवानगीधारकांसाठी  पाणी उपसा करण्याची मुदत 28 फेब्रुवारी रोजी संपत असल्याने नंतर पाणी उपसा तात्काळ रोखावा  अन्यथा तीव्र पाणीटंचाई  जाणवेल अशी भीती  व्यक्त होत आहे. तर पाणी नासाडी प्रकरणी प्रकरणी संबंधितांची चौकशी करावी अशी मागणी आहे.  दरम्यान शाखा अभियंता एस. पी. मोरे यांनी  पाणी चोरी झाली तसेच पाणी वाया जात असले तरी कमी कर्मचारी असल्याने कार्यवाही करणे कठीण होत असल्याचे सांगून कानावर  हात ठेवले. (वार्ताहर)नदीजोड प्रकल्पांतर्गत 15 फूट खोल पाट खोदला आहे. परंतु त्याचे काम 10 वर्षापासून रखडले आहे. या पाटालादेखील चोरुन पाणी सोडल्याचे सांगण्यात येत आहे,  तसेच मोंढाळा रोडवरील पाटचा:या उथळ असल्याने त्यांची सफाई न करता वरवर काम केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहहे.  यामुळेच पाणी अस्ताव्यस्त  वाहत जाऊन प्रचंड नासाडी झाली. 100 टक्के प्रकल्प भरलेला होता आता 25 टक्के जलसाठा शिल्लक आहे