पाडळसे, ता.यावल, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या दुसखेडा येथे सार्वजनिक नळाचे पाणी भरताना तोल जावून विद्युत मोटारवर पडल्याने एका २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. आकाश राजेंद्र धायडे असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. दिवाळीच्या तोंडावर गावात शॉक लागून तरुणाला मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.सोमवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास दुसखेडा येथे सार्वजनिक नळाला पाणी आले होते. आकाश हा विद्युत मोटार लावून पाणी भरत होता. पाणी भरणे झाल्यानंतर तो अंगणात पाणी शिंपडत होता. पाणी शिंपडत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो थेट विद्युत मोटारवर पडला. त्यात विद्युत शॉक बसून त्याचा जागेवरच मृत्यू झाला. वडिलांच्या निधनानंतर आकाश मामाकडे राहायला होता. त्याच्या पश्चात वृद्ध आई व एक भाऊ असा परिवार आहे.घटनेची माहिती मिळताच फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हवालदार सुधाकर पाटील, सय्यद इकबाल हे घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
दुसखेडा येथे पाणी भरताना विद्युत मोटारवर पडल्याने तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 19:39 IST
पाडळसे, ता.यावल, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या दुसखेडा येथे सार्वजनिक नळाचे पाणी भरताना तोल जावून विद्युत मोटारवर पडल्याने एका २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. आकाश राजेंद्र धायडे असे मृत तरुणाचे नाव आहे.
दुसखेडा येथे पाणी भरताना विद्युत मोटारवर पडल्याने तरुणाचा मृत्यू
ठळक मुद्देदिवाळीच्या तोंडावर शॉक लागून तरुणाला मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.