जळगाव : रायसोनी नगरातील दिलीप भगवान बोदडे (३५) या तरुणाचा जिल्हा रुग्णालयात सोमवारी मृत्यू झाला. दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच बोदडे यांचा मृत्यू झाला होता. बोदडे हे सरकारी नोकरीला होते. काही दिवसापासून आजारी होते. श्वास नलिकेत अन्न व कफ अडकल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे. वैद्यकिय अधिकारी डॉ.विजय कुरकुरे यांच्या खबरीवरुन रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
अपघातप्रकरणी गुन्हा दाखल
जळगाव : उमाळा घाटात दोन दिवसापूर्वी झालेल्या अपघात प्रकरणी एम.एच.४१ ए.यु.१८०७ या ट्रक चालकाविरुध्द मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. २७ फेब्रुवारी रोजी रात्री हा अपघात झाला होता. त्यात डिगंबर रामरास भोसले व नम्रता रामेश्वर चौधरी (रा. वाकोद, ता.जामनेर) दोन जण ठार झाले होते. सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे तपास करीत आहेत.
कुसुंब्यातून दुचाकी चोरी
जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथील तुळजाई नगरातून मनोज संतोष पवार (२५) या तरुणाची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र.एम.एच.१९ बी.झेड.६७३४) चोरट्यांनी लांबविल्याची घटना १ मार्च रोजी उघड झाली. याप्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास गणेश शिरसाळे करीत आहे.
गणपती नगरातून दुचाकी लांबविली
जळगाव : मोहाडी रस्त्यावरील आनंद नगरात वास्तव्याला असलेल्या लोकेश ताराचंद कपलानी (१७) या तरुणाची २० हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र.एम.एच.१९ सी.एच.५२०२) चोरट्यांनी गणपती नगरातून २१ फेब्रुवारी रोजी लांबविली आहे.याप्रकरणी मंगळवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास चंद्रकांत पाटील करीत आहे.