शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमविवाह केलेल्या तरुणीपाठोपाठ तरुणाचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 19:46 IST

पाळधी येथील प्रकरण : तिघांना अटक

जळगाव : प्रेमविवाहानंतर मृत्यू झालेल्या तरुणीसोबतच तिचा प्रियकर तथा पती प्रशांत विजयसिंग पाटील (रा.पाळधी, ता.धरणगाव) याचाही शनिवारी सकाळी उपचारादरम्यान जळगावात मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे दोघं कुटुंबियांनी एकमेकावर आरोप केलेले आहेत. प्रियकराचे वडील विजयसिंग बाबुराव पाटील, त्याचा मित्र विकास धर्मा कोळी व विक्की उर्फ विजय संतोष बोरसे (रा.पाळधी, ता.धरणगाव) या तिघांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. या तिघांना 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत विजयसिंग पाटील व आरती विजय भोसले या दोघांनी प्रेमप्रकरणातून पलायन केले होते व नंतर प्रेमविवाह करुन परत आल्यावर दोनच दिवसात आरतीचा मृत्यू झाला. प्रशांत याच्या घरात ३१ डिसेंबर रोजी ही घटना घडली. प्रशांत याने या दिवशी मित्रांसोबत घरात पार्टी केली होती. त्यानंतर एका खोलीत आरती अधर्नग्न अवस्थेत तर प्रशांत दुसऱ्या खोलीत बेशुध्दावस्थेत आढळून आले होते. रुग्णालयात दाखल केल्यावर आरतीला डॉक्टरांनी मृत घोषीत केले होते. आरतीच्या बाबतीत घातपात इतर प्रकार झाल्याचा संशय तिच्या आई, वडीलांनी व्यक्त करुन तिच्या सासरचे व मित्रांना अटक होत नाही,तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे पोलिसांनी शुक्रवारी आरतीचे वडील विजय हरसिंग भोसले यांच्या फिर्यादीवरुन पती प्रशांत विजयसिंग पाटील, सासरे विजयसिंग बाबुराव पाटील, मित्र विकास धर्मा कोळी, विक्की उर्फ विजय संतोष कोळी व नणंद कविता सुनील पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. शनिवारी सकाळी वरील तिघांना अटक झाली. त्यानंतर प्रशांतच्याही मृत्यूची बातमी धडकली.

व्हीसेरा ठेवला राखीवआरती व प्रशांत या दोघांचा मृत्यू विषारी द्रव्यामुळे झाल्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांना मिळाला असून नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी दोघांचाही व्हिसेरा राखीव ठेवण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी दिली. दरम्यान, मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याने तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त होत होता, मात्र तसा काहीच प्रकार नसल्याचेही शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालेले आहे. प्रशांतच्या कुटुंबाविरुध्द गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई झाली आहे, त्यामुळे आता आमचाही मुलगा मृत झाला असून आरतीच्या कुटुंबियावरुध्द गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई करावी, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा प्रशांतच्या बहिणीने व इतर कुटुंबियांनी घेतला होता. पोलिसांनी मध्यस्थाची भूमिका बजावत प्रशांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव