शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

प्रसुतीनंतर जोंधनखेडा येथील महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 13:00 IST

मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

नशिराबाद/जळगाव : गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर दुर्गा रवींद्र जाधव (वय-२६, रा़ जोंधनखेडा, ता़ मुक्ताईनगर) या विवाहितेचा तीन तासानंतर अचानक मृत्यू झाला़ ही घटना शुक्रवारी पहाटे ५ वाजता उघडकीस आली़ दरम्यान, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू झाला, असा आरोप करीत नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार दिला़ मात्र, पोलिसांनी समजूत घातल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला व सायंकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले़गुरूवारी रात्री दुर्गा यांना प्रसुतीसाठी कुटूंबीयांसह नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले होते़ मात्र, पुरेशी सुविधा आणि रक्तसाठा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुढील उपचारासाठी रात्रीच हलविण्यात आले़ त्यानंतर मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास दुर्गा यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला़ शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला़ ही माहिती मिळताच नातेवाईकांनी आक्रोश केला़विवाहितेच्या शरीरात रक्ताचे कमी प्रमाण असल्यामुळे आम्ही रक्ताच्या बॉटल्स् उपलब्ध करून दिल्या होत्या़ परंतू, त्यांनी त्या वापरल्याच नाही, तसेच प्रसुतीनंतर आवश्यक ते उपचार न मिळाल्यामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला व संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पावित्राही घेतला. या घटनेचे वृत्त कळताच यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल, नशिराबाद येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक आऱटी़धारबळे यांनी घटनास्थळी धाव घेत नातेवाईकांची समजूत घातली. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.या विवाहितेची प्रकृती गंभीर होती. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सर्पदंश व इतर घटनांचे रुग्ण जास्त असल्याने जागेअभावी महिलेला हलविण्याचा सल्ला देण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण समजेल.-डॉ. किरण पाटील, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा रुग्णालय.प्रसूतीसाठी आलेल्या विवाहितेची अगोदरच स्थिती नाजूक होती. तिचा रक्तदाब वाढलेला होता. जिल्हा रुग्णालयातून पाठविण्यात आल्यानंतर आम्ही योग्य ते उपचार केले व रक्ताच्या दोन बाटल्याही देण्यात आल्या.- डॉ. रुपेश पाटील, डॉ.उल्हास पाटील, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय

 

टॅग्स :Deathमृत्यूJalgaonजळगाव