आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:50 PM2019-02-15T12:50:29+5:302019-02-15T12:51:47+5:30

शाळेत असतानाच बिघडली प्रकृती

Death of a student of ashram school |  आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

 आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

Next
ठळक मुद्देदोन दिवसापूर्वीच आली घरी


जळगाव : तालुक्यातील डोमगाव येथील अनुदानित आश्रम शाळेतील सातवीची विद्यार्थिनी मीना कैलास बारेला (वय २३, मुळ रा. सेंधवा, ह. मु. वसंतवाडी, ता.जळगाव) हिचा बुधवारी मध्यरात्री संशयास्पद मृत्यू झाला. पोटात त्रास व तोंड सुजलेले असल्याने ती दोन दिवसापूर्वीच वसंतवाडी येथे आली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मीना बारेला ही विद्यार्थिनी डोमगाव येथील निवासी आश्रमशाळेत शिक्षण घेत होती व तेथेच वास्तव्याला होती. पोटात दुखणे व तोंडाला सूज आल्यामुळे दोन दिवसापूर्वीच ती घरी आली होती. तिच्या तळहातालाही जखम होती, असे आईचे म्हणणे आहे. रात्री १२ वाजता प्रकृती बिघडली. नंतर दीड वाजता प्राणज्योत मालवली.
मृतदेह हलविला जिल्हा रुग्णालयात
मीना हिचा मृत्यू झाल्यानंतर गावातच अंत्यसंस्कार करण्याची तयारी होत असताना विद्यार्थिनीच्या मृत्यूची बातमी आदीवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना समजली. त्यांनी शाळेच्या कर्मचाºयांना मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्याच्या सूचना केल्या. यावल आदीवासी प्रकल्प अधिकारी आर.बी.हिवाळे यांनी रुग्णालय गाठून विद्यार्थिनीच्या आईकडून तसेच आश्रम शाळेच्या कर्मचाºयांकडून माहिती जाणून घेतली. मृत्यू नेमका कशामुळे झाला हे आता सांगता येणार नाही. त्याचे कारण कळावे म्हणूनच मृतदेह शवविच्छेदनासाठी आणल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
आश्रम शाळेत हलगर्जीपणाचा आरोप
आश्रम शाळेत विद्यार्थ्यांची पुरेशी काळजी घेतली जात नाही तसेच कर्मचारीही तेथे न थांबता अपडाऊन करतात असा आरोप काही जिल्हा रुग्णालयात काही जणांनी केला. दरम्यान, याबाबत चौकशी करुन योग्य ती दखल घेतली जाईल, अशी माहिती हिवाळे यांनी दिली. गेल्या १८ वर्षापासून बारेला कुटुंब वसंतवाडी शिवारात राजेश पाटील यांच्या शेतात वास्तव्य करीत आहेत.

Web Title: Death of a student of ashram school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.