पाचोरा, जि.जळगाव : धावत्या रिक्षातून पडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना पाचोरा-जळगाव रोडवर घडली. प्रकाश देवसिंग गोपाळ (चव्हाण) (वय ५५, रा.साजगाव, ता.पाचोरा) असे मयताचे नाव आहे.ते पाचोºयाहून घरी साजगाव येथे प्रवास करीत होते. तेव्हा पीजे रेल्वेलाईनजवळ अचानक रिक्षातून पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली.त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी मृत घोषित केले.याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुले असा परिवार आहे. ते साजगावचे माजी सरपंच अशोक गोपाळ तसेच माध्यमिक विद्यालयाचे उशिक्षक दिलीप गोपाळ यांचे बंधू होत. अंत्ययात्रा शनिवारी सकाळी नऊला साजगाव येथून निघेल.
पाचोऱ्याजवळ रिक्षातून पडून एकाचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 21:57 IST
धावत्या रिक्षातून पडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना पाचोरा-जळगाव रोडवर घडली. प्रकाश देवसिंग गोपाळ (चव्हाण) (वय ५५, रा.साजगाव, ता.पाचोरा) असे मयताचे नाव आहे.
पाचोऱ्याजवळ रिक्षातून पडून एकाचा जागीच मृत्यू
ठळक मुद्देपाचोरा-जळगाव रोडवरील सायंकाळची घटनावैद्यकीय अधिकाºयांना घोषित केले मृत