शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

मरण माझे मरोनि गेले..... मज केले अमर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 23:53 IST

अमळनेरच्या एका डाॅक्टरला सोशल मिडियाव्दारे जिवंतपणीच दोनवेळा श्रध्दांजली वाहण्याचा प्रकार घडला.

ठळक मुद्देडॉक्टरला सोशल मिडीयाने दोन वेळा मारले

संजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर :  सध्या कोरोनाची धास्ती मनात एव्हढी बसली आहे की सोशल मीडिया उघडताच मृत्यू जास्त डोळ्यासमोर येतात , गावातून फेरफटका मारला की भावपूर्ण श्रध्दांजलीचे डिजिटल फलक लागलेले दिसतात अन साहजिक तोंडातून शब्द निघतो  हे केव्हा गेले ? चांगली व्यक्ती होती हो ती ...पण या सोशल मिडीयाने आता जण कहरच केला आहे. 

अमळनेरचे एक डॉक्टर अन्य उपचारासाठी दवाखान्यात दाखल झाले आणि याची चर्चा सोशल मिडीयावर सुरु झाली.. कुणीतरी त्यांचा फोटो टाकला आणि श्रद्धांजली वाहण्याची रांगच लागली... आणि या डॉक्टरांनी जिवंतपचीण मरण माझे मरोनि गेले... या संत तुकाराम महाराजांचा अभंगाचा अनुभव घेतला. 

बालरोग तज्ज्ञ डॉ. नितीन पाटील यांच्याबाबतीत घडला. एक आजारासाठी ते दवाखान्यात  दाखल झाले. आणि त्याच काळात कोरोनाचा कहर वाढला होता. एकाने पोस्ट टाकली की डॉ. नितीन हे दवाखान्यात दाखल झाले .. अन काय विचारता पूर्ण न वाचताच एका पाठोपाठ भावपूर्ण श्रद्धांजली सुरू झाली.  आणखी काही दिवस गेले त्यांची प्रकृती खराब झाली म्हणून चर्चा गावात पसरली अन सायंकाळपर्यंत डॉ.  नितीन यांचे वाईट झाले म्हणत उलट सुलट चर्चा वाऱ्यासारखी पसरली.

त्यांचे मित्र डॉ. शरद बाविस्कर यांनी सोशल मिडीयावर सांगितले की मी आताच त्यांच्याशी बोललो तेव्हा कुठे अफवा थांबल्या. मंगळवारी डॉ. नितीन पाटील दुरुस्त होऊन सुखरुप घरी पोहचले.  आता आपण लवकरच नियमित सेवेत हजर होणार असा संदेश त्यांनी टाकला. तरीही  सोशल मीडिया जोरात चालवणारे मात्र वाचन न करणाऱ्यांनी पुन्हा भावपूर्ण श्रद्धांजलीचे संदेश टाकले. पुन्हा डॉ. पाटील यांच्या मित्रपरिवाराने ते सेवेत हजर होणार असल्याचे सांगितल्यावर हा प्रकार थांबला. 

श्रध्दांजली वाहण्याची घाई..

सोशल मीडियावर निवड, अभिनंदन, वाढदिवस, लगीनदिन यासाठी फोटो टाकायचा अवकाश असतो तेवढ्यात भावपूर्ण श्रद्धांजली चे १० संदेश पडतात अन नंतर वाढदिवस असल्याचे कळते  पुन्हा संदेश मिटवण्याची नामुष्की येते.

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरSocial Mediaसोशल मीडिया